यावल : तरुणीकडे मोबाईल नंबर मागितल्याने दोन गटात हाणामारी | Latest jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating

तरुणीकडे मोबाईल नंबर मागितल्याने दोन गटात हाणामारी

यावल (जि. जळगाव) : हरीपुरा येथे लग्न समारंभामध्ये एका तरुणीकडे मोबाईल क्रमांक मागितल्यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर दंगलीत झाले. यात मोहराळे व हरीपुरा गावातील गटांमध्ये दंगल घडून 8 जण जखमी झाले आहे. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात परस्परांच्या फिर्यादीवरून 13 जणांवर दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयासह गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

हरीपुरा (ता. यावल) येथील रमजान तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हरीपुरा गावात यांच्या मुलीचे लग्न होते. या लग्नात मोहराळे येथील उखर्डू तडवी यांचा जावई मंडप टाकण्यासाठी आला होता. त्याने या लग्न समारंभामध्ये एका तरुणीकडे तिचा मोबाईल क्रमांक मागितला, आणि यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर प्रचंड हाणामारी झाले. हरीपुरा आणि मोहराळा येथील नागरिकांची आपसात मोहराळा गावात मशिदीजवळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोघं गटातील पाच जण जखमी झाले आहेत.

यातील काही जखमींना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात, तर काही जखमींना गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी हरीपुरा (ता. यावल) येथील रमजान भायखाँ तडवी यांच्या फिर्यादीवरून मोहराळा येथील रहिवासी आयुब हसन तडवी व इतर त्याच्यासोबत पाच जणांविरुद्ध फिर्यादी रमजान तडवी, आसिफ तडवी, शरीफ तडवी, सखुबाई भायखाँ तडवी यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुतण्यानेच केला काकाचा खून

याच प्रकरणी दुसरा एक गुन्हा मोहराळे (ता. यावल) येथील सलीम लुकमान नहाळ यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आमजद रमजान तडवी, शरीफ सुपडू तडवी, आसिफ सुपडू तडवी, सुपडू तडवी, रमजान तडवी व त्यांच्यासोबत दोन अशा आठ जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. व फिर्यादीच्या डोक्यात उलट्या कुऱ्हाडीने वार करून त्यांना जखमी केले म्हणून दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: आधी केला विरोध, नंतर बसला धक्का... वीस जणांचे अख्खे कुटुंबच कोरोनाबाधित

Web Title: Argument In 2 Groups Due To Asked For Her Mobile Number At A Wedding Ceremony In Haripura Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaoncrimeBeating
go to top