आर्या फाउंडेशनतर्फे चक्रीवादळग्रस्तांना मदत

दिवाळीच्या आधीच एकूण ५० कुटुंबांना महिनाभराचे किराणा सामानाचे वाटप
JAMNER CYCLOEN
JAMNER CYCLOENSAKAL
Published on

जळगाव : जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात चक्रीवादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये गरजूंना नेहमीच मदतीचा हात देणारी जळगावातील आर्या फाउंडेशन ही संस्था या शेतकरी कुटुंबाच्या मदतीला धावून आली. या कुटुंबांची दिवाळी सुखकर जावी, या हेतूने दिवाळीच्या आधीच एकूण ५० कुटुंबांना महिनाभराचे किराणा सामान आर्या फाउंडेशनतर्फे देण्यात आले.

जामनेर तालुक्यातील सामरोद, मांडवे, कापूसवाडी, ढालसिंगी, भागदरा, नांद्राहवेली या गावांतील एकूण ५० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जामनेर येथील पाटील ट्रेडर्स येथे किराणा सामानाचे वितरण करण्यात आले. गेल्या आठवड्यात संजयकुमार पाटील आणि किरण पाटील यांनी वरील गावांना भेट देत योग्य त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार केली. त्यानुसार प्रत्येक कुटुंब प्रमुखाला जामनेर येथे आमंत्रित करून वरील साहित्य देण्यात आले.

आर्या फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी तालुक्यातील अन्य नुकसानग्रस्त कुटुंबांनादेखील मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी आर्या फाउंडेशनला आर्थिक मदत पोचविणाऱ्या सर्व दानशूरांचे आभार मानले. संजयकुमार पाटील, किरण पाटील, जितेंद्र पाटील, ललित जैन, संजित पाटील, पूनम पाटील, आर्या पाटील, गजानन कचुवा, भूषण चौधरी, मुकेश शिवदे, सचिन सपकाळे, शरद लाव्हरे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com