

Jalgaon
esakal
जळगाव/अमळनेर: आषाढी जाणाऱ्या एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला खानदेशातील वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेने उधना-मिरज उधना विशेष रेल्वे (क्रमांक ०९०७१/०९०७२) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे सुरू करावी, यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने आषाढी वारीसाठी विशेष रेल्वे उपलब्ध झाली आहे.