Diwali 2023: फटाके फोडण्यासाठी रात्री 10 पर्यंतच ‘डेडलाइन’ : सहाय्यक आयुक्त अश्‍विनी भोसले

Diwali Update About Firecracker
Diwali Update About Firecrackeresakal

Diwali 2023 : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरातील वायू प्रदूषण होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शहरात १२५ डेसिबलच्यावर आवाज असलेल्या फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे.

जर कोणी १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके विक्री करताना किंवा फोडताना आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, तसेच सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंतच फटाके फोडावेत, अशी माहिती महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अश्विनी भोसले- गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Assistant Commissioner Ashwini Bhosle inform Deadline for bursting firecrackers till 10 pm only jalgaon news)

महापालिकेच्या नवव्या मजल्यावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक आयुक्त अश्‍विनी भोसले म्हणाल्या, की शहरात रात्री सात ते दहापर्यंतच कमी आवाजातील फटाके येतील; परंतु मोठ्या आवाजाचे फटाके फोडताना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलिस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल.

तसेच बांधकामाचे काम करताना मालमत्ताधारकाने त्या बांधकाम क्षेत्राला आजूबाजूने पत्रा किंवा ग्रीन नेटच्या सहाय्याने झाकणे गरजेचे आहे. त्यामुळे उडणारी धुळ हवेत मिसळू नये, याची दक्षता मालमत्ताधारकाने घ्यावी, तसेच वेस्ट मटेरिअलची वाहतूक करताना देखील ते झाकणे आवश्यक असून, उघड्यावर टायर, कचरा, प्लास्टिक जाळणे हा कायद्याने गुन्हा आहे.

त्यामुळे कोणी असे कचरा, टायर, प्लास्टिक जाळताना आढळून आल्यास त्यांना दहा हजार रुपये दंड आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे.

Diwali Update About Firecracker
Diwali 2023 : गरिबीला असं घराबाहेर काढतात या महिला, दिवाळीदिवशी गावभर ऐकू येतो सूप अन् काठीचा आवाज!

त्याचप्रमाणे स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना गोवऱ्या, गॅस दाहिनी किंवा इलेक्ट्रिक दाहिनीचा वापर करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रदूषण नियंत्रण बैठकीत सूचना

महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महापालिका, वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाची बैठक बुधवारी (ता.८) आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या दालनात झाली. बैठकीत आमदार सुरेश भोळे हे देखील उपस्थित होते. या वेळी शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी एसटी महामंडळ, मनपासह वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाला सूचना करण्यात आल्या.

या वेळी प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत, सहाय्यक आयुक्त अश्विनी भोसले, वाहन निरीक्षक श्रद्धा महाजन, प्र. सह आयुक्त उदय पाटील, अग्निशमन विभागाचे शशिकांत बारी, प्रभाग अधिकारी नरेंद्र चौधरी, प्रकाश सोनवणे, लक्ष्मण सपकाळे, इंद्रजित पाटील पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Diwali Update About Firecracker
Diwali 2023 : दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारस... प्रियजनांना द्या खास मराठीत शुभेच्छा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com