Jalgaon Crime News : भुसावळमध्ये ‘खाकी’वर हात; सहाय्यक निरीक्षकावर चौकात फायटरने हल्ला

crime news
crime newsesakal

भुसावळ (जि. जळगाव) : गुन्हेगारीमुळे राज्यात बदनाम असलेल्या भुसावळात पुन्हा ‘खाकी’वर हात उचलण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत फायटरने केलेल्या हल्ल्यात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक जिजाबराव पाटील जखमी झाले. याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, संशयित फरारी आहे. (Assistant inspector attacked by fighter in square at bhusawal jalgaon Latest Crime News)

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

crime news
Jalgaon Milk Union Election : 2 मंत्री, आमदार, माजी आमदारांची काट्याची लढत

शहरात काही दिवसांपासून पुन्हा चोऱ्या, घरफोडीच्या घटनांत वाढ झाली असताना, आता गुन्हेगारांची दिवसागणिक हिंमतही वाढत आहे. जेथे पोलिसही सुरक्षित नाहीत, तेथे सर्वसामान्य जनतेचे काय, असा प्रश्न सूज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत. शहरातील वसंत टॉकीजजवळील महाराणा प्रताप चौकात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक जिजाबराव पाटील सोमवारी (ता. २१) दुचाकी (एमएच १९, डीआर ५६७५)ने जात असताना, दुपारी साडेबाराच्या सुमारास येथील संशयित सोनू पांडे (पूर्ण नावाची नोंद नाही) अचानक दुचाकीसमोर आला. त्यामुळे श्री. पाटील यांनी दुचाकी थांबवली.

सोनू पांडे याला त्यांनी ‘रस्त्याने जाताना पाहून चाल’, असे सांगितले. त्याचे वाईट वाटल्याने पांडे याने त्याच्याजवळील फायटरने जिजाबराव पाटील यांच्यावर हल्ला करीत शिवीगाळ केली. या हल्ल्यात श्री. पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार केल्यानंतर शुक्रवारी (ता. २५) त्यांनी तक्रार दिल्यानंतर संशियत सोनू पांडेविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय कंखरे तपास करीत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर संशियत पांडे फरारी असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुंडप्रवृत्तीचा बिमोड करावा, अशी मागणी होत आहे.

crime news
SAKAL Exclusive : इलायची केळीचा प्रयोग यशस्वी; तांदलवाडीत कापणी सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com