Jalgaon : ते, आले..अन्‌ कारवाई करत न बोलता निघूनही गेले..!

PFI office bearer Abdul Haddi Abdul Rauf Momin Arrested by ATS
PFI office bearer Abdul Haddi Abdul Rauf Momin Arrested by ATSesakal

जळगाव : शहरातील मेहरुणच्या दत्तनगरातील एका प्रार्थनास्थळावरुन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा पदाधिकारी अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय ३२ वर्षे, रा. रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) याला अकोला एटीएसने अटक करुन नेले. स्थानिक पोलिसांनाही सापडणार नाही अशा दाट लोकवस्तीतून या पथकाने अचूकपणे संशयितास टिपले असून त्याच्या अटकेने आतंकी संघटना ‘सिमी’च्या कटू स्मृतींना उजाळा मिळाला आहे.

रात्रीचा किर्रर्र अंधार.. रातकिड्यांचा आवाज.. अन्‌ ठीक ३.३० वाजता अकोला एटीएसची तीन वाहने धडकली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन मदत मागताच त्यांना रात्रगस्तीवरील वाहनांसह सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, मुद्दस्सर काझी, प्रदीप पाटील, किशोर बडगुजर, अश्पाक शेख, रवी चौधरी यांचे पथक सोबत देण्यात आले. (ATS NIA together action on PFI office bearers Jalgaon News)

असा होता घटनाक्रम

तीन वाहनात बसून एटीएस पथकासह नियोजित धार्मिक स्थळावर धडकले. तेथे, मुदस्सर काझीसोबत एटीएस अधिकारी आत शिरले.. तेथील दार उघडणाऱ्या सेवेकऱ्यास विचारणा केली असता त्याने पोलिस पथकाला आत घेतले.

संपूर्ण पाहणी केल्यावर संबंधित सेवेकऱ्याने सांगितले की, गल्लीतील मुलं गच्चीवर झोपण्यास येतात. तेथे तपासून घ्या. असे म्हटल्यावर पोलिस वर चढले.. तीन तरुण तेथे झोपलेले होते. तिघांना ताब्यात घेतल्यावर.. एकाने शेजारी राहतो व झोपण्यास रोज येतो.. ‘हा’ (संशयित) आजच आला.. मी ओळखत नाही, मला सोडा.. अशी विनंती केली.

दोघांना सोडले, एक ताब्यात

येथील तिघांना घेऊन पथकाने पेालिस ठाणे गाठले. बंद खोलीत चौकशी करून इतर दोघांचा काहीच संबंध आढळून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले. अटक केलेला अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन याला घेऊन पथक औरंगाबादच्या दिशेने सुसाट वेगात रवाना झाले.

अचूक माहिती ‘करेक्ट’ कार्यक्रम

एटीएसच्या मदतीला असलेल्या एमआयडीसी पोलिस पथकालाही निमुळत्या गल्ल्या आणि तो, परिसर अपरिचितच होता. मात्र, कुठलीही विचारपूस न करता.. प्रमुख अधिकाऱ्याच्या हातातील मोबाईल दाखवत असलेल्या दिशेने पथक चालत गेले. पहाटेच्या निरव शांततेतही चालताना एकाच्याही पावलाचा साधा आवाजही होत नव्हता.. तर, कुणाला एकमेकांशी बोलण्याचीही गरज नव्हती. पथकातील १०-१२ लोकांनी एमआयडीसी पेालिसांशी कुठलाच संवाद केला नाही, विचारपूस केली नाही की, माहिती विचारली नाही.. थेट संबंधित स्थळी धडकत संशयितास ताब्यात घेतले.

PFI office bearer Abdul Haddi Abdul Rauf Momin Arrested by ATS
Nashik : वनविभागाकडून दुर्मिळ प्रजातीचे कासव जप्त; एकास अटक

दुपारी सर्वच अवाक्

जळगावकर गाढ झोपेत असताना, अकोला एटीएसने मांजर पावलांनी येऊन अचूक पद्धतीने संशयितास टिपले. दिवस उजाडल्यावर.. परिसरातील रहिवासी ज्याच्या त्याच्या कामावर निघून गेले. ‘नेहमीसारखे आले होते पोलिस.. निघून गेले’ असे म्हणत प्रार्थनास्थळावरही दिवसभराचे कामकाज सुरु झाले. अन्‌ दुपार होता.. होता संपूर्ण देशभरात नेमक्या त्याच वेळेस कारवाईच्या बातम्या झळकल्यावर जळगावकरांमध्ये खळबळ उडाली.

१९९९ची ती गुप्त कारवाई

अकोला एटीएसच्या कारवाईने जळगावचे नाव बदनाम करणाऱ्या ‘सिमी’ संघटनेच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. सन १९९९मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक कुलवंत कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रविघातक

कृत्यातील सहभागावरुन जळगावातील मास्टर कॉलनी, अक्सानगर भागातील अकरा ‘सिमी’च्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात या संघटनेवर बंदी घालण्यात आली. त्या स्मृती आज यानिमित्ताने ताज्या झाल्या.

‘तो’ जळगावात आला कसा?

अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन हा जळगावात कधी आला होता, याबाबत काही ठोस माहिती समोर आली नसली तरी, तो बुधवारी सायंकाळी जळगावात आल्याचे सांगितले जात आहे. त्याचा कुणी मित्र, जळगावात राहत असल्याचेही समोर येत असून त्याला कोणी आश्रय दिला? त्याचा काही सहभाग तर नाही याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

PFI office bearer Abdul Haddi Abdul Rauf Momin Arrested by ATS
अबब! कोथिंबिरीला मिळाला हजारांत भाव; शेतकरी मालामाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com