Latest Marathi News | बँकेचे ATM फोडून पैसे लांबविण्याचा प्रयत्न फसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Crime News : बँकेचे ATM फोडून पैसे लांबविण्याचा प्रयत्न फसला

जळगाव : चिंचोली (ता. जळगाव) येथील आरबीएल एटीएमच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. ३) समोर आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, एटीएमच्या सीसीटीव्हीत घटनेचे चित्रीकरण झाले आहे.

जळगाव-अजिंठा राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली येथे आरबीएल बँकेचे शेजारीच एटीएम आहे. तेथे गोपाल बाविस्कर सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला आहे. सोमवारी सकाळी नऊला बाविस्कर नेहमीप्रमाणे कामावर आला. या वेळी त्याने एटीएम चेक केले असता, त्याच्या कॅशरॅकचा दरवाजा उघडा दिसला.(Attempt to withdraw money by breaking bank ATM failed Jalgaon Crime news)

हेही वाचा: Jalgaon : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर सोने, चांदीत उसळी

त्याने ही बाब तातडीने बँकेचे व्यवस्थापक सोहेल मुख्तार देशमुख यांना दूरध्वनीवरून कळविली. त्यानुसार नेमकी घटना काय आहे जाणून घेण्यासाठी देशमुख यांनी घटनास्थळ गाठले. यादरम्यान एटीएममधील इतर कोणतेही पार्ट उघडले न गेल्याने मुख्य सेफ चोरट्यांना उघडता आले नाही.

म्हणूनच त्यातील रक्कम सुरक्षित असल्याचे समोर आले. या प्रकरणी देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँकेच्या मशिनचा दरवाजा तोडून, नुकसान करून तसेच चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक मुदतसर काजी तपास करीत आहेत.

हेही वाचा: Dussehra Melava : ढोल-ताशांच्या गजरात : कल्याण-डोंबिवलीतून शिवसैनिक शिवतीर्थाच्या दिशेने