Jalgaon News : प्रवाशांना धडक देऊन रिक्षा उलटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Jalgaon News : प्रवाशांना धडक देऊन रिक्षा उलटली

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : अ‍ॅपेरिक्षाने रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलांना धडक दिल्याने ती उलटून यातील महिला ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. ८) घडली. (autorickshaw hit the woman standing on road it overturned killed women jalgaon news)

अ‍ॅपेरिक्षा चालकाने रिक्षा (एमएच १९, एएक्स-३१६८) भरधाव वेगाने रिक्षा आणत रस्त्यावर वाहनासाठी वाट पाहणाऱ्या महिलांना जोरदार धडक दिली.

धडक दिल्यामुळे ॲपेरिक्षा उलटून यात बसलेली सीमा अविनाश पाटील (वय ३५, रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) ही महिला ठार झाली.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

या अपघातात रस्त्यावर उभ्या असलेल्या आशाबाई मनोहर महाजन, प्रणव श्रीराम महाजन, दिपाली उमाकांत तायडे व वत्सलाबाई भागवत पाटील हे प्रवासी जखमी झाले.

या प्रकरणी रिक्षाचालक किशोर श्रीराम महाजन ( रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर) याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.