
Jalgaon News : बाह्मणे गावाने जपली बिनविरोधाची परंपरा! आमदारांची सदिच्छा भेट
अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील बाम्हणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभा पाटील तर उपसरपंचपदी विजय पाटील यांची बिनविरोध निवड करून बिनविरोधाची परंपरा कायम राखणाऱ्या या गावास आमदार अनिल पाटील यांनी पद्ग्रहण सोहळ्याप्रसंगी सदिच्छा भेट दिली, तसेच हे गाव आता विकासाच्या दिशेने जात असल्याचे भाकीत व्यक्त केले. (Bahmane village preserved tradition of non confrontation Goodwill visit of MLA anil patil Jalgaon News)
आमदार अनिल पाटील यांनी बिनविरोध झालेले नूतन लोकनियुक्त सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य वंदना पाटील, मनीषा पाटील, शालू पाटील, वैशाली पाटील, राधेशाम भिल यांचा सत्कार केला.
उपसरपंच निवडीसाठी अमळनेर पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यांना ग्रामसेवक अभिजित देवरे सहाय्यक तर कर्मचारी म्हणून अधिकार पाटील यांनी सहकार्य केले.
बिनविरोध निवड झाली, आता फक्त विकासाचे स्वप्न रंगवा, असे आमदार अनिल पाटील यांनी सांगत आमदार निधीतील सभामंडप जागा,जिल्हा परिषद शाळा संरक्षकभिंत कामाची पाहणी केली.
तसेच नवीन पाणीपुरवठा योजना, पांझरा नदी संरक्षणभिंत, ग्रामपंचायत कार्यालय, शेत शिवार रस्ते, तलाठी कार्यालय, गावात काँक्रिटीकरण, स्मशानभूमी (बांधकाम, सुशोभीकरण, सांत्वनओटा) आदी मंजूर कामासह उर्वरित कामांना लवकर मंजुरी देऊन प्रारंभ केला जाईल, असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी दिले.
हेही वाचा: Jalgaon News : राज्य शासनाकडून 208 कोटी 88 लाखाचा निधी मंजूर!
दरम्यान, बाह्मणे गावाने गेल्या२५ वर्षांपासून एखादे अपवाद वगळता बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवली आहे. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक देखील यंदा गावाने बिनविरोध करून युवा तरुण नेतृत्व गणेश भामरे यांना अध्यक्षपदी बिनविरोध विराजमान केले आहे.
त्याचवेळी आमदारांनी ग्रामस्थांचे कौतुक करून ग्रामपंचायत देखील बिनविरोध केल्यास पद्ग्रहण सोहळ्याला मी उपस्थिती देईन आणि विकासासाठी भरघोस निधीही देईल, अशी ग्वाही दिली होती. ती शब्दपूर्ती आमदारांच्या या भेटीने झाली आहे.
या वेळी माजी सरपंच प्रवीण पाटील, विकास सोसायटी अध्यक्ष गणेश भामरे, माजी सरपंच चंद्रकांत पाटील, यादव सनेर, धर्मराज पाटील, माजी अध्यक्ष धनराज पाटील, प्रकाश पाटील, हिरालाल पाटील, उपाध्यक्ष बारीकराव पाटील, जगदीश पाटील, भिकन पाटील,संतोष पाटील, राजेंद पाटील, यशवंत पाटील, वसंत पाटील, शांताबाई पाटील,
हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त
हेही वाचा: Jalgaon News : तरसोद-पाळधी बायपासमुळे वाहतुकीचा भार होणार कमी
कलाबाई पाटील, युवराज पाटील, नवल पाटील, देविदास पाटील, रमेश पाटील, आधार पाटील, दत्तात्रेय पाटील, दिनेश पाटील, शशिकांत पाटील, सुनील पाटील, ललित पाटील, संजय पाटील, सुनील पाटील, मोतीलाल पाटील, जिजाबराव पाटील, नितीन पाटील, दिनेश पाटील, किशोर पाटील, रवींद्र मिस्तरी, भय्यासाहेब पाटील, वसंत पाटील, किशोर पाटील, अमृत पाटील, राजेंद्र पाटील, प्रभाकर पाटील, आदींसह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
या निवडीचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, भाजप नेत्या ॲड. ललिता पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीच्या माजी मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील,
पंचायत समितीचे उपसभापती भिकेश पाटील, काँग्रेसच्या शेतकरी आघाडीचे सुभाष पाटील, बाजार समिती माजी संचालक पराग पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, तसेच धुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे नेते व महिंदळे येथील सरपंच दिनेश पाटील यांनी अभिनंदन केले.
हेही वाचा: Jalgaon News : चोपडा तालुक्यात ऊस लागवड घटण्याची चिन्हे