जळगाव : यंदा केवळ दहा लाख कापूस गाठींचे उत्पादन

कापूस खरेदीतील अंदाज चुकले; कापूस बाजारात येत नसल्याचा परिणाम
bales of cotton Consequences of cotton not coming market
bales of cotton Consequences of cotton not coming marketsakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात यंदा कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. उत्पादन अधिक प्रमाणात होऊन १५ ते १८ लाख गाठींची निर्मिती होईल, असे कापूस उद्योजक सांगत होते. नंतर मात्र अतिवृष्टीने कपाशी हातची गेली. अनेक ठिकाणी कपाशीचे उत्पादन घटले. परिणामी, कापूस बाजारात येण्याचे प्रमाण घटले. कापसाला दहा हजारांपर्यंत दर देऊनही बाजारात कापूस येत नसल्याने सध्या ५० टक्केच जिनिंग प्रेसिंग सुरू आहेत. तेही केवळ आठवड्यातील तीन दिवस. दुसरीकडे कापूसनिर्मिती दहा लाख गाठीपर्यंतच होईल किंवा नाही, याबाबत शंका आहे. जो अंदाज १५ ते १७ लाख गाठी निर्मितीपर्यंत व्यक्त केला होता.

यंदा जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. यंदा खानदेश जिनिंग प्रेसिंग ओनर्स असोसिएशने १५ लाख गाठी उत्पादनाचे लक्ष्यांक ठेवले होते. कापसाला यंदा कधी नव्हे तेवढा ९ ते ९५०० ते दहा हजार प्रतिक्विंटल दर मिळूनही शेतकरी कापूस बाजारात विक्रीस आणत नाही. यामुळे जिनिंग उद्योग चालविणे कठीण झाले आहे. आतापर्यंत केवळ सात लाख गाठींची निर्मिती झाली आहे.

दर वर्षी शासनातर्फे सीसीआय, पणन महासंघाच्या माध्यमातून हमीभावाने कापूस खरेदी होते. मात्र, यंदा कापूस अल्प असल्याने व्यापाऱ्यांनीच अगोदरच आठ हजारांपासून दर देणे सुरू केले. कापूस अधिक बाजारात येण्यासाठी नऊ ते दहा हजारांपर्यंत सध्या दर खासगी व्यापारी दर देत आहेत. असे असले, तरी शेतकरी बाजारात कापूस विक्रीस आणत नसल्याचे चित्र आहे. जिनिंग उद्योग सध्या कापसाअभावी ५० टक्के बंद आहेत.

... अशी आहेत कारणे

  • यंदा तीन ते चार वेळा अतिवृष्टी झाली

  • अनेक ठिकाणी कापूस बोंडातच सडला

  • कापसात ओल असल्याने भाव मिळाला नाही

  • दर अजून अधिक मिळेल, यामुळे काहींचा कापूस घरातच

वर्ष लक्ष्यांक खरेदी

२०१५-१६ १५ लाख गाठी १५ लाख ५० हजार

२०१६-१७ १५ लाख १४ लाख ३४ हजार

२०१७-१८ १५ लाख १६ लाख ६० हजार

२०१८-१९ १६ लाख १४ लाख ३५ हजार

२०१९-२० १५ लाख १३ लाख ७० हजार

२०२०-२१ १५ लाख ११ लाख

२०२१-२२ १५ लाख ७ लाख

कापूस यंदा बाजारात येत नसल्याने ५० टक्के जिनिंग बंद आहे. जे सुरू आहेत ते तीनच दिवस व एकाच पाळीत सुरू असतात. आतापर्यंत सात लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. कापसाची क्वालिटी सध्या घसरली आहे. यामुळे आगामी काळात दहा लाख गाठी उत्पादन करू किंवा नाही, याबाबत शंका आहे.

-प्रदीप जैन, अध्यक्ष खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com