जळगाव तालुक्यातील केळी इराण ला रवाना

करंज व परिसरातील शेतकऱ्यांची निर्यातक्षम केळी उत्पादनात यशस्वी वाटचाल.
jalgaon
jalgaonsakal

जळगाव : तालुक्यातील करंज या गावातील युवा शेतकऱ्यांनी शेती कडे व्यवसायिक दृष्टीकोनाने बघून शेती करून केळी पिकाचे उच्चतम उत्पन्न घेतले आहे. केळी पिकाची बाजारपेठ चा अभ्यास करून निर्यातीकरिता आवश्यक असणाऱ्या बाबीबाबत प्रशिक्षण घेऊन आपल्या केळी बागेमध्ये सदरी गोष्टींचा वापर केल्याने आज गावातील शेतकऱ्यांची केळीला निर्यातदार पसंती देत आहेत.

करंजा गावच्या युवकांनी निर्यातक्षम उत्पन्न घेण्याकरिता आवश्यक असलेल्या बाबी (बड इंजेक्शन तंत्रज्ञान चा योग्य वेळी वापर, फ्लोरेट योग्य वेळी काढणे, केळी घडाचे व्यवस्थापन इ.) इत्यादी बाबी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जळगाव व कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद यांच्या सहकार्याने प्रशिक्षण आयोजित करून निर्यातक्षम केळी करिता उपयुक्त तंत्रज्ञान अवगत केले व परिसरातील शेतकरी व मजुरांना प्रशिक्षित केले व आपल्या केळीच्या बागेमध्ये निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्यास यशस्वी झाले.

आज दि.१६/०९/२०२१ पर्यंत ७ गाड्या (७० टन) केळी करंज गावातून धरती कृषि संवर्धन प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून निर्यात करण्यात आलेले आहे. केळीची निर्यात केल्यानी संबंधित शेतकऱ्यांना स्थानिक बाजार भावापेक्षा रू.२०० - २५०/- प्रति क्विंटल अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व आनंदाचे चित्र निर्माण झाले आहे.

आजपर्यंत करंज येथील शेतकरी श्री.प्रदीप शांताराम पाटील, श्री.प्रदीप जगन्नाथ पाटील,श्री.किशोर हिलाल पाटील यांच्या शेतातील केळी इराण येथे निर्यात करण्यात आलेली आहे. आज करंज येथून केळी निर्यातीकरिता रवाना होते वेळी उपस्थित श्री.संभाजी ठाकूर (जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव) डॉ.हेमंत बाहेती (कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र मामुराबाद)श्री. एस. व्ही. झांबरे (तालुका कृषि अधिकारी जळगाव) श्री.वैभव सुर्यवंशी (विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र मामुराबाद) श्री.किरण जाधव (विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र मामुराबाद) श्री.व्ही.एन.चौधरी (कृषि पर्यवेक्षक) श्री.सोनू पाटील(तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,जळगाव)श्री. यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी श्री.मोहन आबा सोनवणे, कृषिभूषण श्री.अनिल सपकाळे, श्री.किशोर हिलाल पाटील,श्री.प्रदीप जगन्नाथ पाटील, श्री. ज्ञानेश्वर पाटील,श्री.प्रदीप शांताराम पाटील, श्री. सुनिल काशिनाथ सपकाळे, श्री.सुनिल प्रल्हाद सपकाळे, श्री.योगराज पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

कृषी विभागातील आत्मा यंत्रणा व कृषी विज्ञान केंद्र मामुराबाद यांनी निर्यातक्षम केळी उत्पादन व कीड व्यवस्थापन या विषयाच्या आयोजित प्रशिक्षणाद्वारे आमच्या परिसरातील शेतकरी व मजुरांना प्रशिक्षित केले त्याचा परिणाम योग्य वेळी योग्य नियोजन करून केळी पिकाच्या निर्यातीकरिता आवश्यक बाबींचा अवलंब केला असता आज रोजी बाजार भाव नुसार कटाई केली असती तर रू.११००/- ते ११२५/- भाव मिळाला असता परंतु सदरील केळी ही डाग मुक्त व उच्च दर्जाचे असल्याने निर्यातदाराने रू.१३२५/- सदर जागेवर घेऊन केळी खरेदी केलेली आहे. यापुढे देखील काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आयोजित केल्यास त्याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com