Jalgaon : बहिणीची भेट घेत धावत्या रेल्वेसमोर दिले झोकून

late Irfan Sheikh
late Irfan Sheikhesakal
Updated on

जळगाव : रेल्वे स्टेशनजवळ दुचाकी लावून धावत्या रेल्वेखाली ४५ वर्षीय गृहस्थाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. शेख इरफान शेख याकूब मनियार (वय ४५, रा. हाजी अहमदनगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कौटुंबिक त्रासातून इरफान यांनी मृत्यूला कवटाळल्याचा संशय व्यक्त होत आहे. (Bangle seller commits suicide while his wife is not home Jalgaon Latest Marathi News )

late Irfan Sheikh
सिन्नरमध्ये पुराचा कहर! उभी पिके, घरे पाण्यात; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इरफान शेख याकूब मानियार (वय ४५) पत्नी व दोन मुलांसह सालारनगर जवळील हाजी अहमदनगर येथे वास्तव्याला होते. शहरातील सराफ बाजार भवानी मंदिराजवळ दुकान लावून बांगड्या विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांची पत्नी रूखसानाबी या मुजाहिद व जैद अशा दोन्ही मुलांसह दोन दिवसांपासून नंदुरबार येथे माहेरी गेलेल्या होत्या. त्यामुळे शेख इरफान घरी एकटेच होते.

बहिणीच्या घरून थेट रेल्वे स्टेशन

इरफान यांनी बहिणीच्या घरून निघाल्यावर शिरसोली रेल्वे स्थानक गाठले. बाहेर गाडी लावून देत रेल्वे रुळाच्या दिशेने पायी चालत जाऊन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेस समोर स्वतःला झोकून देत त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

रेल्वे मोटरमनकडून स्टेशन मास्टरला खबर देण्यात आली. स्टेशन मास्टरने एमआयडीसी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्‍हा रुग्णालयात हलवण्यात आले. खिशातील कागदपत्रे आणि दुचाकीवरून इरफानची ओळख पटवण्यात आली.

late Irfan Sheikh
सिन्नरमध्ये पुराचा कहर! उभी पिके, घरे पाण्यात; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

जेवणाचा डबा पाठव... म्हणत निघाला

सासरी असलेल्या कोणत्याही बहिणीच्या घरी तिच्या भावाचे येणे प्रचंड आनंद देणारे असेच असते. गुरुवारी (ता. १) शेख इरफान दुचाकीने बहिण मलेकाबी यांच्या घरी आले. बहिणीने चहा-नाश्ता करून दिला. त्यानंतर मला दुपारचा डबा करून दे असे म्हणतच...

बहिणीशी बोलून इरफान दुचाकी घेऊन निघून गेले आणि तासाभरात त्यांच्या मृत्यूची बातमी धडकल्यावर मलेकाबीचा विश्वासच बसेना... तशाच अवस्थेत त्यांनी जळगाव गाठले. भावाला बघू द्या म्हणत बहिणीने प्रचंड आक्रोश केला. मयताच्या पश्चात आई फातेमाबी, पत्नी रूखसानाबी, मुजाहिद व जैद अशी दोन मुले, लहान भाऊ सलिम शेख व बहिणी असा परिवार आहे.

late Irfan Sheikh
आईस्क्रिम बेतलं चिमुकलीच्या जीवावर; विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com