Latest Marathi News | बसमधील मुलींना अश्लाख्य ईशारे करणाऱ्याला चोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: The bus came to Zilla Peth police station with girls

Jalgaon Crime News : मुलींना इशारे करणाऱ्याला दिला चोप; नारळपाणी विक्रेत्याला अटक

जळगाव : बसमधील मुलींना अश्लाख्य हातवारे करणाऱ्या नारळपाणी विक्रेत्यास जमावाने चोपले. मदरशातील मुलींना महिनाभरापासून हर्शल गोकुळ पाटील (वय २४, रा. मेहरुण) त्रास देत होता. बस थांबवून केअरटेकर महिलेने जाब विचारला असता, त्या महिलेवर हात उगारल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. जळगाव शहरातील विविध भागांतून शाहूनगरमधील जामेआतुल-मक्सुरात शिक्षण संस्थेत मुली शिक्षणाला येतात. (Beating a coconut seller for misbehave with bus travel girl Jalgaon Crime News)

हेही वाचा: Eknath Khadse | गिरीश महाजनांनी अत्यंत खालची पातळी गाठली : एकनाथ खडसे

सोमवारी (ता. २१) बसचालक हसन मुसा मणियार बस (एमएच ०४, वाय २८८७)मधून मुलींना घेऊन जात असताना, बहिणाबाई उद्यानाजवळील पंचम हॉस्पिटलखाली नारळपाणीची गाडी लावणारा तरुण मुलींना इशारे करीत होता.

मुलींनी बसमधील केअरटेकर हसिनाबी जब्बार पटेल यांना दाखविले. तातडीने तिथेच बस थांबवून त्यांनी तरुणाला जाब विचारला असता, त्याने त्या महिलेच्या अंगावर हात उगारला. चौकात गर्दी होऊन नारळपाणी विक्रेत्यास चोप देत जिल्‍हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक संदिप गावित यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Jalgaon News : मुलाच्या मामामुळे फसला सैराट गेम; अल्पवयीन मुलीसह तरुण पोलिसांच्या ताब्यात

बस थेट पोलिस ठाण्यात

बसमध्ये ८ ते १५ वयोगटातील मुलींना हातवारे करणारा हर्शल पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर मुलींना घेवून बस थेट जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात धडकली. मुलींनी पोलिस अधिकाऱ्याकडे त्याची तक्रार केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: Money Fraud : ऊसतोड कामगारांकडून ठेकेदाराला गंडा; 11 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल