
Jalgaon News : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य
अमळनेर (जि. जळगाव ) : केंद्र शासनाने जानेवारी २०२३ पासून अन्न सुरक्षा कायद्याखाली दिले जाणारे धान्य मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. (Beneficiaries priority families will get free food grains under Antyodaya Food Scheme under Food Security Scheme jalgaon news)
त्यानुसार १ जानेवारी २०२३ पासून अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेमध्ये दिले जाणारे धान्य वर्षापर्यंत मोफत दिले जाईल. हे धान्य या आधी लाभार्थ्यांना २ ते ३ किलो या दराने दिले जात होते.
धान्य देताना त्याची स्वतंत्र पावती दिली जाईल. या धान्याची उचल करताना लाभार्थ्याचे स्वतंत्र बायोमेट्रिक प्रमाणीकरण (इ-पॉस मशीनवर वेगळ्याने अंगठा देणे) करावे लागेल.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
अमळनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना वर्षभर उपरोक्त धान्याचे पैसे द्यावे लागणार नसल्याचे पत्रक तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी काढले आहे.