Bhadgaon School Incident
esakal
जळगाव
Bhadgaon School Incident : हृदयद्रावक! शाळेच्या हलगर्जीपणामुळे दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; संरक्षण भिंतीवरून घसरून थेट पडली नाल्यात...
Tragic Nursery Student Deaths in Bhadgaon School : भडगाव येथील इंग्लिश मीडियम शाळेत सुरक्षेअभावी नर्सरीतील दोन चिमुकली मुले नाल्यात पडून मृत्युमुखी पडली. शाळा प्रशासनावर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
Bhadgaon School Incident : भडगाव (जळगांव) येथील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (Adarsh Kanya School English Medium School) घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेली दोन चिमुकली बालके शाळेच्या आवारातील संरक्षण भिंतीवरून घसरून थेट नाल्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
