Latest Marathi News | भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांचा शिवसेनेतर्फे निषेध व जोडे मारो आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amalner: Office bearers and workers of Shiv Sena Uddhav Thackeray group protesting and protesting

Jalgaon : भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांचा शिवसेनेतर्फे निषेध व जोडे मारो आंदोलन

अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांचा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोडेमारो आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

शहरातील महाराणा प्रताप चौकात सोमवारी (ता. २१) सकाळी अकराला हे आंदोलन करण्यात आले. (Bhagat Singh Koshyari and Sudhanshu Trivedi protest by Shiv Sena and do jode maro agitation Jalgaon News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची...

हेही वाचा: Jalgaon News : झोका खेळताना गळफास लागून मुलाचा मृत्यू

तालुकाप्रमुख विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपचे सुधांशू त्रिवेदी तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी छत्रपती शिवराय यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते म्हणून भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या धिक्काराच्या घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी विजय पाटील, बाबू परब, महिला आघाडीच्या मनीषा परब, नाना ठाकूर, अनंत निकम, देवेंद्र देशमुख, मयूर पाटील, विमल बाफना, मोहन भोई, दादा पवार, गोरख पाटील, बाळासाहेब पवार, प्रताप शिंपी, जीवन पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Jalgaon News: मंत्री महाजनांसह दोघा आमदारांकडून खडसे Target; DPDCत रंगला सामना