Bhavesh Patil Murder Case : वाळू व्यावसायिक हत्याकांडात तिसरा कौन?

Late Bhavesh Patil
Late Bhavesh Patilesakal
Updated on

जळगाव : वाळू व्यवसायातील आपसी वादातून निवृत्तीनगरात भावेश पाटील या वाळू व्यावसायिकाची निघृण हत्या करण्यात आली. घटनेच्या आधी व नंतर दोन्ही मारेकऱ्यांच्या संपर्कात शहरातील जळगावची ‘दगडी चाळ’ म्हणून ओळखली जाणाऱ्या गल्लीतील कथित ‘वस्ताद’च्या संपर्कात मारेकरी असल्याची चर्चा शहरात आहे.

सात दिवसांच्या (ता. १ सप्टेंबर) कोठडीत असलेल्या भूषण आणि मनीष या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने तपास त्याच्या पर्यंतच थांबून आहे. या ‘वस्ताद’ वर पोलिसांचा हात पडेल की, नाही याची अपेक्षा परिसरातील रहिवाशांना मात्र लागून आहे. (Bhavesh Patil Murder Case Who is third person in sand commercial murder Jalgaon latest crime news)

आव्हाणेचे अर्थकारण बदलले

जळगाव तालुक्यातील आव्हाणे गाव पूर्णतः वाळू माफियांच्या आधिपत्याखाली आलेले असून गावातील तरुणांनी शेतीव्यवसाय सोडून वाळूत जम बसविल्याने गावाचे अर्थकारण बदलून गेले आहे. मूळ आव्हाणे (ता.जळगाव) येथील रहिवासी तसेच वाळू व्यवसायानिमित्त जळगावात स्थायिक झालेल्या भावेश उत्तम पाटील (वय-३२) याचे भूषण सपकाळे व मनीष पाटील याच्याशी व्यवसायावरुन गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते.

गावातील भाऊबंदकी आणि पैसा याच्या जोरावर भावेशचे बऱ्यापैकी वजन होते. पूर्वी मैत्री असताना भावेश, मनीष अशा दोघांनी गावातील एका पत्रकालाही जिवे मारण्याची धमकी दिली होती. पत्रकाराला मारझोडही झाल्याची तक्रार तालुका पोलिसांत देण्यात आली होती. त्यानंतर गावातील वाळू व्यावसायिकांचे दोन गट पडल्यानंतर या दोन्ही गटाला जळगावच्या टोळ्या चालवत होत्या.

भावेशचे बऱ्यापैकी व्यवसाय सुरु होते. याचे कसे व्यवस्थित सुरु आहे म्हणून त्याच्यावर अनेकांचा डोळा होता आणि तेथूनच दोघांशी झालेल्या जुन्या वादाला वारंवार फोडणी मिळत असल्याने त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने दोघांनी त्याची हत्या केल्याचे भावेश आणि मनीष यांनी यापूर्वीच पोलिसांसमक्ष कबूल केले आहे. या गुन्ह्यात इतर कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कुणी सहभागी आहे का...याच्यावर मात्र दोघेही नकार घंटा हलवत आहे.

Late Bhavesh Patil
MVP Election : पहिल्या फेरीची मतमोजणी अंतिम टप्यात; अटीतटीची लढत

हत्येनंतर व हत्येपूर्वीची ‘यावल वारी’

भूषण व मनीष हे दोघेही जळगाव शहरातील त्यांच्या एका वस्तादच्या संपर्कात होते. हत्येच्या दिवशी भावेश सेंधवा येथे (मध्यप्रदेश) गेला असल्याने दोघेही त्याला सकाळपासून फोन करून बोलवत होते. भावेशची हत्या होण्यापूर्वीच त्याला कुणकूण लागल्याने त्याने त्याच्या चुलत भावाला फोन करून आव्हाणे येथून जळगावी बोलावून घेतले होते.

तर, अटकेतील दोघेही हल्ला करण्यापूर्वी आणि नंतर यावल येथील एका ढाब्यावर या व्यक्तीला भेटल्याचे सांगितले जात आहे. तसेच घटनास्थळावरून पळून जाताना त्यांच्या ‘बॉस’ला भेटूनच यावलमार्गे दोघेही भुसावळला पळाले होते. परिणामी दोघेही फरार झाल्यानंतर तोदेखील बेपत्ता झाला होता.

कॉल रेकॉर्ड करेल उलगडा?

मारेकरी भूषण व मनीष यांच्या संपर्कात असलेला त्यांचा वस्ताद याच्याशी त्यांचे बोलणे झाल्याचे सांगितले जात आहे. त्या सोबतच मारेकरी व त्यांचा वस्ताद म्हणावणारा ‘बॉस’ जिल्हा पोलिस दलातील जेम्स बॉण्ड पोलिसांच्या संपर्कात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या सर्वांच्या मोबाईल रेकॉर्डवरुन गुन्ह्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे किंवा नाही याचा उलगडा होणार आहे. सोबतच पोलिसदलात कार्यरत कथित जेम्सबॉण्ड पोलिस आणि वाळूमाफिया पोलिसांवर कारवाई करण्याची सुवर्ण संधी पोलिस खात्याला चालून आल्याचे सांगितले जात आहे.

‘त्या’ दादा पोलिसांची सेटलमेंट थिअरी

पोलिस खात्यात राहून जळगाव पोलिसदल आणि गुन्हेगारी विश्व चालवणारे काही ‘जेम्स बॉण्ड’ पोलिस जिल्ह्यात सक्रिय आहेत. भावेशची पोलिसांसोबतही उठबस होती. प्रतिस्पर्धी वाळू व्यावसायिक, पोलिस खात्याचा पगार घेणारे वाळूमाफिया पोलिस आणि कथित ‘जेम्स बॉण्ड’ पोलिस अशा त्रिवेणी संगमात भावेश हत्याकांडाची उकल दडलेली आहे.

भावेशच्या हत्येपूर्वी यावल येथे बैठक होऊन भावेशला संपवल्यानंतर पळून जाताना मारेकऱ्यांनी पुन्हा यावल गाठले. वस्तादची भेट घेत पळून जाण्यासाठी रोख रक्कमही दोघांना देऊन त्याने भुसावळमार्गे पळून जाण्याचे सांगत स्वतःही पसार झाला.

शहरातील ‘दगडी चाळ’मधून गायब असलेला भूषण सपकाळे व मनीष पाटील यांचा वस्ताद पुन्हा परतला असून तो, अटकेतील देाघांसाठी पोलिसांच्या मदतीने डब्यासह इतर सुविधा पुरवण्यासह सोडवण्यासाठी आवश्यक कायदेशीर मदतीची जुळवाजुळव करत आहे.

Late Bhavesh Patil
MVP Election : पहिल्या फेरीची मतमोजणी अंतिम टप्यात; अटीतटीची लढत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com