esakal | Bhusawal | आयुध निर्माणी आजपासून महामंडळात
sakal

बोलून बातमी शोधा

आयुध निर्माणी आजपासून महामंडळात

भुसावळ : आयुध निर्माणी आजपासून महामंडळात

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसवा

भुसावळ : देशभरातील ४१ आयुध निर्माणींच्या खासगीकरणाचा (महामंडळ) निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यात भुसावळ आयुध निर्माणीचाही समावेश असून, या ४१ निर्माणींची सात नवीन प्रकल्पात विभागणी करण्यात आली आहे. हे प्रकल्प शुक्रवारी (ता. १५) विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशाला समर्पित केले जाणार आहेत. यात भुसावळ कारखान्याचा यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती महाप्रबंधक वसंत निमजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी पत्रकार परिषदेस आयुध निर्माणीचे अतिरिक्त महाप्रबंधक निलाद्री विश्‍वास, अप्पर महाप्रबंधक राजीव कुमार, जनसंपर्क अधिकारी पी. देवीचंद, प्रशासकीय अधिकारी तरुण कुमार, कनिष्ठ कार्यप्रबंधक एस. आर. पाटील उपस्थित होते. या वेळी महाप्रबंधक वसंत निमजे म्हणाले, की देशाला दोन दशकांहून अधिक काळ शक्तिशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आयुध निर्माणींनी देशाच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’च्या अंतर्गत आयुध निर्माणींना एक ऑक्टोबरपासून सार्वजनिक क्षेत्रात सात नवीन प्रकल्पांमध्ये रुपांतरित करण्यात आल्याचे श्री. निमजे म्हणाले.

हेही वाचा: जिल्हा बँक निवडणूकःएकनाथ खडसेंनी कन्येसह भरला उमेदवारी अर्ज

स्पर्धेत लाभ होणार

भुसावळ आयुध निर्माणी आता यंत्र इंडियात सहभागी झाली आहे. याचे मुख्य कार्यालय आता यंत्र इंडिया लिमिटेड अंबाझरी, नागपूर येथे आहे. महामंडळांमुळे आता आयुध निर्माणींचा विकास, उत्पादकता आणि नफ्यातील संपत्तीच्या स्वरुपात विकसित होण्यासाठी वाव मिळेल. व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी हातभार लागणार आहे.

‘पिनाका’ची कमी खर्चात निर्मिती

भुसावळ आयुध निर्माणीत रॉकेट लाँचरसाठी आवश्यक असलेल्या पिनाका पॉडची निर्मिती केली जात असून, अगोदर पुणे, अंबाझरीत याची निर्मिती व्हायची. मात्र, त्यांचे उत्पादन मूल्य अधिक होते. तर भुसावळ निर्माणीने अतिशय कमी किमतीत याची निर्मिती केली. त्यामुळे आता भुसावळातच याची निर्मिती केली जात असल्याचे श्री. निमजे म्हणाले.

loading image
go to top