नवलनगरच्या सायकल दुकानदाराची अमळनेरात आत्महत्या

Cycle Shopkeeper Late sandip dhamal
Cycle Shopkeeper Late sandip dhamalesakal

जळगाव : नवलनगर (जि. धुळे) येथील ३० वर्षीय सायकल दुकानदाराने चोपडाई (ता. अमळनेर) शिवारातील विहिरीत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज दुपारी दोनच्या पूर्वी घडली. (Bicycle shopkeeper of Navalnagar commits suicide in Amalner Jalgaon News)

Cycle Shopkeeper Late sandip dhamal
विजेच्या धक्याने बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याची भरपाईची मागणी

संदीप पांडुरंग ढमाळ (वय ३०, मूळ रा. यावल, हल्ली मुक्काम नवलनगर, धुळे) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, संदीप हा बुधवारी (ता. २२) रात्रीपासून नवलनगर येथून गायब होता. तो गेल्या सात- आठ वर्षांपासून सायकल दुकान चालवत होता. आज दुपारी चोपडाई शिवारातील मधुकर सैंदाणे यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह उलट्या अवस्थेत तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यावर जनार्दन पाटील व हितेश चिंचोरे या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. संदीप ढमाळ याने आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

Cycle Shopkeeper Late sandip dhamal
Jalgaon : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com