Jalgaon News : महासभेत जोरदार खडाजंगी; खडसे, जगवानी, भोळेंमुळे गाळेधारकांची दिशाभूल..

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporationesakal

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार गुरूमुख जगवानी व आमदार सुरेश भोळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळात व्यापारी संकुलाच्या गाळेधारकांची दिशाभूल केली.

त्यामुळे महापालिकेच्या संकुलातील गाळ्यांची वसुली थकली आहे, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा, बंटी जोशी यांनी केला, तर भाजपचे विशाल त्रिपाठी, राजेंद्र घुगे-पाटील यांनी आमदार भोळे यांच्यावर आक्षेप घेतल्याबद्दल जोरदार हरकत घेतली. (big fight happen in General Assembly of municipal corporation between bjp shinde shiv sena group corporator jalgaon news)

गेल्या अडीच वर्षांत गुलाबराव पाटील सत्तेत होते. त्यांनी गाळेधारकांचा प्रश्‍न का सोडविला नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला अन्‌ शिंदे गटाचे नगरसेवकही संतप्त झाले. यावरून महासभेत जोरदार खडाजंगी झाली.

महापालिकेच्या २०२३-२४ ची तहकूब अंदाजपत्रकीय सभा बुधवारी झाली. पीठासीन अध्यक्षपदी महापौर जयश्री महाजन होत्या, तर व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

भाजपचे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी महापालिका व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्‍न उपस्थित केला. संकुलातील गाळे भाडे प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी दोन वेळा लक्ष्यवेधी उपस्थित केली आहे. येत्या तीन महिन्यांत त्याचा निकाल लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे गाळे वसुलीवरील तरतूद वाढवावी, अशी मागणी केली.

भाजपच्या नेत्यामुळेच ही परिस्थिती : लढ्ढा

भाजपच्या विशाल त्रिपाठी यांच्या विधानाला शिवसेना शिंदे गटाचे नितीन लढ्ढा यांनी हरकत घेतली. ते म्हणाले, की भाजपच्या नेत्यामुळे आज व्यापारी संकुलातील गाळेभाडे थकले आहे. त्यावेळी भाजपचे नेते एकनाथ खडसे मंत्री होते. गुरूमुख जगवानी आमदार होते. त्यावेळी त्यांनी गाळेधारकांची दिशाभूल करून गाळे भाडे कमी होईल, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी ते भरले नाही.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

jalgaon municipal corporation
Jalgaon Crime: मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी! ४ जखमी, ४५ जण ताब्यात

निवडणुका तोंडावर असल्यामुळे सत्ताधारी अडचणीत यावेत, म्हणून तत्कालीन भाजप नेत्यांनी ही खेळी केली होती. यात त्यांचे केवळ राजकाराणच होते. त्यामुळे भाजपमुळे गाळेभाडे थकले आहे. आजच्या स्थितीतही राज्यात भाजपची सत्ता असताना, आमदार भोळे यांनी तो प्रश्‍न केव्हाच सोडवून घ्यायला हवा होता. अद्यापही ते केवळ लक्ष्यवेधीच उपस्थित करीत आहेत, हे त्यांचे अपयश आहे.

भोळेंमुळेच गाळ्यांचे संकट : बंटी जोशी

शिवसेना (ठाकरे गट) नगरसेवक बंटी जोशी यांनीही गाळ्यांचा प्रश्‍न उपस्थित केला. ते म्हणाले, की आमदार सुरेश भोळे यांच्यामुळेच गाळ्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. फुले मार्केटमधील गाळेधारकांना भाडे कमी करण्यासाठी, तसेच गाळे नावावर करून देण्यासाठी महापालिकेला वेठीस धरण्यात आले. त्या गाळेधारकांची दिशाभूल करण्यात आली. फुले मार्केटनंतर इतर महापालिकेच्या व्यापारी संकुलाचा प्रश्‍नही निर्माण झाला.

पालकमंत्र्यांनी काय केले : त्रिपाठी

भाजपचे विशाल त्रिपाठी म्हणाले, की जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील अडीच वर्षे आणि आताही सत्तेत आहेत. त्यांनी या प्रश्‍नावर काय केले? आमदार भोळे यांनी दोन वेळा लक्ष्यवेधी उपस्थित केली. विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात गाळेधारकांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केला.

jalgaon municipal corporation
Gulabrao Patil | पाळधीतील दंगल माझ्या जीवनातील वाईट प्रसंग : गुलाबराव पाटील

शिंदे गटाचे सदस्य संतप्त

भाजपचे विशाल त्रिपाठी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आक्षेप घेताच शिवसेना शिंदे गटाचे सदस्य मनोज चौधरी, ॲड. दिलीप पोकळे यांनी त्याला हरकत घेतली. ते म्हणाले, की पालकमंत्र्यांनी दोन वेळा गाळेधारकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेतली होती. त्यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी काय केले, हे विचारू नका. त्यानंतर सदस्यांत चांगलीच शाद्बिक वादावादी झाली.

भाजपच्या दोघांनीच लढविली खिंड

महापालिकेत भाजपचे जास्त नगरसेवक आहेत. गाळ्यांच्या प्रश्‍नावर भाजपचे विशाल त्रिपाठी यांना आमदार भोळे यांच्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नितीन लढ्ढा, बंटी जोशी, तसेच शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी, ॲड. पोकळे यांनी धारेवर धरले. त्यांच्या बचावासाठी भाजपचे राजेंद्र घुगे पाटील आले होते.

मात्र, इतर सदस्य गप्प होते. एरवी पक्षाबाबत विरोधकांवर सदस्य जोरदारपणे तुटून पडतात. मात्र, या प्रश्‍नावर इतर सदस्य काहीही न बोल्याचे दिसून आले. भाजप सदस्यांच्या मौनाबाबत चर्चा मात्र सुरू होती. शेवटी भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे सभागृहात आले अन्‌ त्यांनी हा वाद मिटविला.

Jalgaon Politics News : ...या हास्यामागे दडलंय काय? रश्मी ठाकरे, वैशाली सूर्यवंशी यांच्यातील चर्चेकडे लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com