
Jalgaon : भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; महिला गंभीर जखमी
मेहुणबारे (जि. जळगाव) : दुचाकीवरून शेतात जात असतांना भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीस धडक (Accident) दिल्याने दुचाकीस्वार पिकअपखाली आल्याने जागीर ठार (Death) झाले तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना लांबे वडगाव शिवारात घडली.
मृत व गंभीर दोघे सासरे व सून असून ते भोरस येथील रहिवासी आहेत.अपघात होताच पिकअपचालक फरार झाला. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bike rider killed in collision with speeding pickup Woman seriously injured Jalgaon latest accident Marathi News)
घटनेची माहिती अशी की, भोरस बुद्रूक येथील शंकर रामचंद्र वाघ हे त्यांची सून मीना तुलसीदास वाघ हे एमएटी एमएच.19 डब्ल्यू.3655 या दुचाकीवरून आज गुरूवार (ता.14) रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शेतात जात होते. तर त्यांच्या पाठीमागे मुलगा तुलसीदास हा शेतीला लागणारे साहित्य घेऊन हा येत होता.
वडगावपासून 500 मिटर अंतरावर रस्त्यावर पाठीमागून येत असलेल्या भरधाव पिकअप वाहनाने तुलशीदास वाघ यांच्या दुचाकीला कट मारून त्यांच्या पुढे चालणाऱ्या वडिलांच्या एमएटीला जोरदार धडक दिली. त्यात शंकर वाघ व त्यांनी सून मीना हे रस्त्यावर पडले. धडक देणारी पिकअप शंकर वाघ यांच्या छातीवरून गेल्याने त्यांच्या हाताला व डोक्याला जबर मार लागला तर मीना वाघ यांच्या मांडीला व पाठीला मार लागला.
हेही वाचा: आगासखिंड शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
अपघात झाल्याच्या आवाजाने आसपासच्या शेतातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व दोघांना खाजगी वाहनातून मेहूणबारे ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून शंकर वाघ यांना मृत घोषीत केले तर गंभीर जखमी झालेल्या मीना वाघ यांना चाळीसगावात खाजगी रूग्णालयात नेण्यात आले आहे.
बेदरकारपणे वाहन चालवून एटीएम दुचाकीला धडक देवून शंकर रामचंद्र वाघ यांच्या मृत्युस व मिनाबाई यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरणाऱ्या फरार पिकअप वाहनचालकाच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या पिकअप गाडीत वाळु असल्याची चर्चा सध्या लांबे वडगाव येथे सुरू होती.
हेही वाचा: ठेवीच्या मुद्दयावरून अनेकांचे अर्ज बाद; विद्यमान संचालक मात्र ठरले पात्र
Web Title: Bike Rider Killed In Collision With Speeding Pickup Woman Seriously Injured Jalgaon Latest Accident Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..