भाजपला त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी ‘सरकार पडणार’ असे म्हणावे लागतेय- एकनाथ खडसे 

कैलास शिंदे
Wednesday, 2 December 2020

महाविकास आघाडी सरकार पडणार असे भाजपचे नेते ओरडत आहे. परंतू कोणत्या ही परिस्थीती हे सरकार पडणार नाही. पाच वर्षे पूर्णवेळ हे सरकार काम करणार आहे. 

जळगाव : भाजपला त्यांचे  १०५ आमदार सांभाळणे मुश्कील झाले असून  तीन पक्षाचे हे महाविकास आघाडी ‘सरकार पडणार’ असे मजबूरीने म्हणावे लागत असल्याचे सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी आज लगावला आहे. 

वाचा- राष्ट्रवादी पक्षाची गांधीगिरी; खड्डेमय रस्त्यावरून जाणाऱयांना दिले गुलाबपुष्प !

राष्ट्रवादी पक्षाचे क्षाचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांच्या नियोजनासाठी जळगावात आज राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना खडसे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री गुलाबराव देवकर होते. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, माजी आमदार मनीष जैन, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, आदी उपस्थित होते. 

अटलजीनी ट्रक चालविला तर ही रिक्षा का नाही चालणार

अटल बिहारी वाजपेयी यांनी ३२ पक्ष एकत्र करून सरकारचा ‘ट्रक’ पाच वर्षे यशस्वीपणे चालविला, मग राज्यातील तीन पक्षाचे सरकार असलेली ‘रिक्षा’ का नाही चालणार? खोचक टोला भाजपला लगावला.

हे सरकार पडणे अशक्य 
महाविकास आघाडी सरकार पडणार असे भाजपचे नेते ओरडत आहे. परंतू कोणत्या ही परिस्थीती हे सरकार पडणार नाही. पाच वर्षे पूर्णवेळ हे सरकार काम करणार आहे. 

भाजप सोडण्यासाठी भाग पाडले 
मी भाजप पक्ष सोडलेला नाही. मला पक्ष सोडण्यासाठी बाध्य केले. मी राष्ट्रवादीत का प्रवेश केला, याबद्दलही अनेक जण विचारत असतात. मात्र, पवार साहेबांच्या सक्षम नेतृत्वावर विश्‍वास ठेवूनच आपण पक्षात आलो.  

आवश्य वाचा- लग्नासाठी धमकावत विवाहितेवर अत्याचार; गरजेपुरते ‘हम साथ-साथ’ नंतर ‘हम आपके हैं कौन’ -
 

आणि नाराजी नाट्य 
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर प्रथमच झालेल्या बैठकीस उपस्थित राहिलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना बैठकीतच नाराजीनाट्याचा अनुभव आला. माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचा बॅनरवर फोटो नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली व माफी मागण्याची मागणी केली. 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP has to say that this government will fall to manage its MLAs