Jalgaon BJP Executive : भाजपच्या महानगर टीममध्ये 16 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस; नव्या- जुन्या कार्यकर्त्यांना संधी

 BJP
BJPesakal

BJP Executive : भाजप जळगाव महानगर जिल्ह्याची कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांनी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत तब्बल १६ उपाध्यक्षांसह ६ सरचिटणीस, १४ चिटणीसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मेमध्ये श्री. बावनकुळे यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानंतर नव्या कार्यकारिणीच्या निवडीसंदर्भात हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानंतर चार महिन्यांनी जिल्हाध्यक्ष व नव्या कार्यकारिणी निवडण्यात आल्या आहेत.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील व रक्षा खडसे, आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी अभिनंदन केले आहे. (BJP Jalgaon district executive announced news)

असे आहेत उपाध्यक्ष

डॉ. अश्‍विन सोनवणे, सीमा भोळे, नितीन इंगळे, अजय गांधी, सुनील खडके, प्रकाश बालानी, मुकुंदा सोनवणे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मुकुंद मेटकर, सरोज पाठक, प्रदीप रोटे, विशाल त्रिपाठी, राजेंद्र घुगे-पाटील, विजय वानखेडे, राहुल वाघ.

सरचिटणीस असे

अरविंद देशमुख, महेश जोशी, डॉ. राधेश्याम चौधरी, अमित भाटीया, जितेंद्र मराठे, ज्योती निंभोरे. तर चिटणीस म्हणून जयेश भावसार, धीरज सोनवणे, शुचिता हाडा, अमित काळे, डॉ. क्षितीजचंद्र भालेराव, सागर पाटील, जयेश ठाकूर, भूपेश कुलकर्णी, कैलास सोमाणी, विठ्ठल पाटील, नितू परदेशी, विनोद मराठे, केदार देशपांडे, अजित राणे, कोषाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची निवड करण्यात आली आहे.

पश्‍चिम जळगाव जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या पश्‍चिम जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर यांनी जाहीर केली. यामध्ये ९ उपाध्यक्षांसह ४ सरचिटणीस व १० चिटणीसांचा समावेश आहे.

 BJP
BJP Campaign : भाजपच्या आगामी निवडणुक प्रचारासाठी दौडणार ‘सात’; विनोद तावडेंना महत्त्वाचे स्थान

पश्‍चिम जळगाव जिल्हा कार्यकारिणीत जळगाव ग्रामीणसह चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, पारोळा आदी तालुक्यांतील कार्यकर्त्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

असे आहेत उपाध्यक्ष

रोहीत निकम, नूतन पाटील, संजय भास्कर पाटील, मधुकर काटे, संजय छगन महाजन, प्रदीप नाना पाटील, बालासाहेब पाटील, भिका कोळी.

सरचिटणीस असे

सचिन अर्जुन पानपाटील, रेखा दिलीप चौधरी, भिकेश पाटील, धनंजय मांडोळे, तर चिटणीस म्हणून मनोहर पाटील, ॲड. प्रशांत पालवे, प्रमोद सोमवंशी, प्रमिला रोकडे, विवेक चौधरी, प्रमोद पाटील, ज्योती चौधरी, निलेश परदेशी, मीना पाटील, महेश पाटील, नाना पाटील. कोषाध्यक्षपदी कांतीलाल जैन यांची निवड करण्यात आली.

 BJP
Ajit Pawar : अजितदादांना आपण चुकलोय हे समजलंय, त्यामुळंच ते नाराज आहेत; काय म्हणाले ठाकरे गटाचे आमदार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com