
जळगाव : अश्लील फोटो काढून तरुणीला ब्लॅकमेलिंग
जळगाव - मूळ भुसावळ येथील रहिवासी तरुणी शाळेत असताना तिचे फोटो, व्हिडिओ काढून त्यात छेडछाड करून अश्लील व्हिडिओ तयार करून तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराच्या वेळीही संशयिताच्या मित्रांनी त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून गेल्या आठ वर्षांपासून पीडितेवर अत्याचार सुरूच होता. अखेर तिने गाव सोडून जळगावला येणे पसंत केले. मात्र, येथेही संशयितांनी पाठलाग करून तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. या प्रकरणी आता शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
भुसावळातील २२ वर्षीय तरुणी सध्या जळगावात वास्तव्यास आहे. वयाच्या १४ वर्षांपासून साधारणत: आठ वर्षांपूर्वी ती भुसावळ येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्या वेळी भुसावळातील रितेश सुनील बाविस्कर याच्याशी ओळख झाली. त्याने शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमांवेळी ‘मोपिंग’ केलेले अश्लील फोटो व व्हिडिओ मुलीला दाखवले आणि ‘तुला जसे सांगेन तसे कर, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेन,’ असे धमकावून ब्लॅकमेलिंगला सुरवात केली. त्यानुसार तरुणी आठ वर्षांपूर्वी अल्पवयीन असताना गाडीवर जबरदस्तीने बसवून इंजिनघाट परिसरात घेऊन तिथे तिच्यावर अत्याचार केला. सोबत रितेशचा मित्र बंटी आणि राहुल हेदेखील होते.
गुन्हे दाखल
छळाला व अत्याचाराला कंटाळून तरुणीने सोमवारी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रितेश सुनील बाविस्कर, त्याची आई शोभा सुनील बाविस्कर, त्याची बहीण नंदिनी राहुल कोळी, त्याचे वडील सुनील बाविस्कर सर्व (रा. भुसावळ), मित्र ऊर्वेश पाटील ऊर्फ बंटी आणि राहुल (पूर्ण नाव माहीत नाही) अशा सात जणांविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अरुण सोनार तपास करीत आहेत.
लग्नासाठी धमकी...
हा प्रकार गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू होता. याचदरम्यान मुलगी २२ वर्षांची झाली असताना तिच्या नातेवाइकांनी तिचा लग्नाचा विषय सुरू केला. हा विषय रितेशला समजल्यानंतर त्याने १९ एप्रिलला तरुणीला कॉलेजमधून गाडीवर बसून घेऊन बिग बझार येथे जळगावला आणले. या ठिकाणीदेखील विनयभंग करून तिच्यावर अत्याचार केला आणि ‘मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, लग्न केले नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेन’ अशी धमकी दिली.
Web Title: Blackmailing Young Girl Taking Pornographic Photos
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..