Jalgaon News : बुंदी वाटपातून आज आनंदोत्सव; 6 क्विंटल बुंदी, जळगावला 2100 लाडू वाटप

बोदवडला ६ क्विंटल बुंदी वाटप होणार आहे. जळगावला २१०० किलोचे लाडू वाटप होणार आहे.
Bodwad will be allotted 6 quintals of Bundi 2100 kg ladu will be distributed to Jalgaon news
Bodwad will be allotted 6 quintals of Bundi 2100 kg ladu will be distributed to Jalgaon newsesakal

Jalgaon News : बोदवडला ६ क्विंटल बुंदी वाटप होणार आहे. जळगावला २१०० किलोचे लाडू वाटप होणार आहे.

याशिवाय इतरही अनेक ठिकाणी गोडधोड पदार्थाच्या वाटपातून आनंदोत्सव साजरा होणार आहे. (Bodwad will be allotted 6 quintals of Bundi 2100 kg ladu will be distributed to Jalgaon news)

बोदवडला ६ क्विंटल बुंदी वाटणार

बोदवड :- तालुक्यातील सिरसाळा येथे हनुमान मंदिरावर उद्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने सुंदरकांड महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच शहरासह तालुक्यात भगवे ध्वज पताका, मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे बोदवड शहरात बडगुजर समाज नवयुवक मंडळाकडून सहा क्विंटल बुंदी तयार करण्यात आली आहे.

बुंदीचे ८ हजार पाकीट तयार केले असून हे प्रत्येक घरात प्रसाद वाटप करण्यात येणार आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मरी माता देवस्थानच्या वतीने पन्नास किलो शिरा प्रसाद वाटप करण्यात येणार तसेच गावात मोठा मारोती संस्थान वतीने एक क्विंटल खिचडी व शिरा वाटप केला जाणार आहे.

त्याच प्रमाणे गजानन महाराज मंदिरावर १९ पासून तीन दिवस कीर्तन आणि उद्या मतदानाला महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. राममंदिरात महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.

Bodwad will be allotted 6 quintals of Bundi 2100 kg ladu will be distributed to Jalgaon news
Ayodhya Ram Mandir Inauguration: आज राम मंदिराचे लोकार्पण; प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त ठरला! दिवसभराचा कार्यक्रम कसा असेल? जाणून घ्या

शहरात प्रभात फेरी मार्गाने बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जय बजरंग व्यायाम शाळा , राममंदिर, महादेव मंदिर, याच्या वतीने शहरातून प्रभात फेरी मार्गाने मोठा मारोती संस्थान राम लक्ष्मण सिता हनुमान याची वेशभूषा करून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

जळगावला २१०० किलो लाडू वाटप

जुने जळगाव बहुउद्देशीय मित्र मंडळ व जय हनुमान मित्र मंडळ बदाम गल्ली विठ्ठल पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचा समारोप सोमवारी (ता.२२) होणार आहे.

या सोहळ्यानिमित्त परिसर सजविण्यात आला आहे. यासाठी आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर ललित कोल्हे, विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत संघटन मंत्री ललित चौधरी यांच्या सहकार्याने ही कथा होतेय.

सोमवारी सकाळी १० वा. काल्याचे कीर्तन, दुपारी १ वा. शोभायात्रा निघेल. सायंकाळी भरीत- पुरी, मोहनथाळ या महाप्रसादाचे देखील वाटप होणार आहे. भंडारा रामाप्रसादासाठी २५०१ किलो बुंदीचे प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तर २५ क्विंटल वांग्याचे भरीत देखील करण्यात येणार आहे.

Bodwad will be allotted 6 quintals of Bundi 2100 kg ladu will be distributed to Jalgaon news
Ayodhya Ram Mandir : दक्षिण मध्य रेल्वेतर्फ 4 फेब्रुवारीला मराठवाड्यातून अयोध्येसाठी विशेष रेल्वे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com