Jalgaon News : अमळनेरला घरफोडी; 2 लाखांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon News : अमळनेरला घरफोडी; 2 लाखांचा ऐवज लंपास

अमळनेर : शहरातील भगव्या चौकातील मनोहर संकुलातील रहिवासी, एलआयसीचे सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्याच्या घरातून सुमारे एक लाख ८५ हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने

लंपास (Looted) केल्याची घटना गुरुवारी (ता. २३) सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान घडली. (Burglary at Amalner 2 lakhs rupees and gold looted jalgaon crime news)

हिमांशू ओमबीर सिंह (मूळ रा. हरियाणा, ह.मु. मनोहर संकुल, भगवा चौक) गुरुवारी सायंकाळी सातला एलआयसी ऑफिसमधून घरी परत आले असता, घराला फक्त कडी लावली होती. घरातील कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. मात्र, त्यांची आई घरी आली असता, त्यांनी सांगितले, की सायंकाळी सहाला त्या घराला कुलूप लावून योगा क्लासला गेल्या होत्या.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

संशय आल्याने घरातील वस्तू तपासल्या असता, घरातील ५० हजारांची रोकड, ६० हजारांचे व २० ग्रॅमचे सोन्याचे कानातले, ६० हजारांची व २० ग्रॅम सोन्याचा हार, १५ हजार रुपयांची अंगठी, असा एकूण एक लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaoncrimerobbery