जळगाव : भारनियमनामुळे शहरात घरफोड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

theft

जळगाव : भारनियमनामुळे शहरात घरफोड्या

जळगाव - कोळसा टंचाईमुळे शहरातील भारनियमनात वाढ झाली असून खासकरून रात्रीचे भारनियमन चोरट्यांसाठी पर्वणी ठरले आहे. गेल्या चार दिवसांपासून रोजच घरफोडीच्या घटना घडत असून गुरुवारी (ता. २८) शहरातील मोहननगर परिसरात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह ५८ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्वल दत्तात्रय ठाकूर (वय २६, रा. मोहननगर, वृंदावन गार्डनजवळ, जळगाव) हा तरुण आपल्या आई व बहिणीसोबत वास्तव्याला आहे. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घराला कुलूप लावून नगर येथे काकाकडे भेटण्यासाठी उज्वल आई व बहिणीसोबत गावाला गेले होते. बंद घर पाहून चोरट्यांनी संधी साधत घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने असा एकूण ५८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, घराचा दरवाजा उघडा असल्याने शेजारच्यांना शंका आली. त्यांनी उज्वलला फोन करून सांगितले असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. उज्वल घरी आल्यावर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त दिसून आला. याप्रकरणी बुधवारी (ता. २८) रामानंदनगर पोलिस ठाण्यात उज्ज्वल ठाकूर यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुशिल चौधरी करीत आहे.

Web Title: Burglary Due To Loadsheding In Jalgaon City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top