Jalgaon Crime News : ‘त्या’ आंदोलनात ‘इकरा’ची बस आणि विद्यार्थी; 69 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Crime News
Crime Newsesakal
Updated on

जळगाव : भाजप नेत्यांसह राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चासह विविध संघटनांतर्फे जळगाव शहरात मंगळवारी (ता. १३) ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. या आंदोलनात इकरा शिक्षण संस्थेच्या बसद्वारे शाळकरी विद्यार्थ्यांना सहभागी करून गैरवापर केल्याप्रकरणी संस्थाध्यक्षासह आंदोलकांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे. (Bus and students of Iqra school in movement against governor Case registered against 69 people including chief principal Latest Jalgaon News)

राज्यपाल भगतसिंह कोशियारी, भाजप नेते सुधांशू त्रिवेदी, रावसाहेब दानवे व राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून लोकसंघर्ष मोर्चा, जनक्रांती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, जिजाऊ ब्रिगेड यांच्यासह विविध संघटनांतर्फे रास्ता रोको आंदोलने करण्यात आले. आकाशवाणी चौकातील आंदोलन पोलिसांनी मोडीत काढल्यावर आंदोलकांनी बांभोरी पुलाकडे धाव घेतली. मात्र, वाटेतच त्यांना ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करून व गुन्हा दाखल करून जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने जामिनावर मुक्त केल्यानंतर पुन्हा आंदोलकांनी रास्ता रोको करत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वेठीस धरली. या आंदोलनात इकरा शिक्षण संस्थेच्या स्कूल बस (एमएच ४८, बीएम ५३०९) द्वारे शाळकरी विद्यार्थ्यांना इच्छाविना सहभागी करून घेण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Crime News
Ghaziabad Railway : रेल्वे रुळावर रिल्स बनवनं पडलं महागात; एक्स्प्रेसच्या धडकेत मुलीसह तिघांचा मृत्यू

यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल

लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार (वय ७०, रा. काट्याफाईल), रमेश माणिक पाटील (रा. आव्हाणी), भाऊसाहेब सुकदेव सोनवणे (वय ४०, रा. भोकर), योगेश दत्तात्रय पवार (३२, रा. आव्हाणी), नरेश राजेंद्र पाटील (३३), राकेश रमेश पाटील (२८, रा. दादावाडी) यांच्यासह एकूण ६९ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक मोहन सायकर तपास करीत आहेत.

महिलांची ‘खाकी’ला दया

आंदोलनात आदिवासी भागातील महिलांनाही सहभागी करून घेतले होते. या अशिक्षित महिलांना कलम- १५९ची साधी नोटीस देत पोलिसांनी रवाना केले. मात्र, नेहमी आंदोलने करणाऱ्या महिला आणि उच्च शिक्षित महिलांना दाखल गुन्ह्यात समाविष्ठ करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.

Crime News
Shivsena: सुरेश जैन ठाकरेंसोबत की शिंदेंसोबत? गुलाबराव पाटलांच्या बॅनरमुळे चर्चांना उधाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com