Jalgaon News : संगणक परिचालकपदाची परीक्षा घेण्यास नकार; चौकशीची मागणी

 exam
examesakal

जळगाव : सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) येथे नियुक्त करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालकपदासाठी उमेदवारांना लेखी पत्र देऊन परीक्षेला बोलाविले. मात्र, त्यांची परीक्षा घेण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे उमेदवार संतप्त झाले असून, त्यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. (candidates post of Gram Panchayat Computer Operator invited examination but authorities refused to conduct examination jalgaon news)

जळगाव जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतीसाठी संगणक ऑपरेटरपदे भरली जातात. सातगाव डोंगरी येथे या पदाची भरती काढण्यात आली. यासाठी १३ उमेदवार आले. २० जानेवारीला ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेत गैरप्रकार झाल्यामुळे उमेदवारांनी त्याला लेखी हरकत घेतली. त्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही परीक्षा रद्द केली.

त्यानंतर २४ जानेवारीस स्वतंत्र पत्र काढून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र दिले. त्यात त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र लिहून आपले सरकार सेवा केंद्रचालकांच्या परीक्षेविरुद्ध आलेल्या तक्रारीची दखल घेऊन परीक्षार्थीची तांत्रिक चाचणी ३१ जानेवारीस सकाळी साडेअकराला घेण्यात येईल. त्या वेळी परीक्षार्थीनी उपस्थित राहावे, असे कळविले होते.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

 exam
Sakal Charcha Satra : कृषीला बुस्टर, ‘आत्मनिर्भर भारत’वर भर, भविष्याचा विचार...

या पत्रानुसार मंगळवारी (ता. ३१) उमेदवार या परीक्षेला जिल्हा परिषदेत उपस्थित राहिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी ही परीक्षा घेता येणार नाही. आपला आदेश आपण मागे घेत आहोत, असे सांगितले व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास नकार दिल्याचे उमेदवारांनी सांगितले.

याप्रकरणी चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी फिरोज न्याजअली सय्यद, विकास हिलाल पाटील, भिला आधार पाटील, आकाश रूमसिंग राजपूत, अविनाश कबीर तडवी, आबेद न्याजअली सय्यद यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

 exam
Jalgaon News : DPDCचा 50 टक्केही खर्च नाही? खर्च न झाल्यास कारवाईचा इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com