Car Accident : ओव्हरटेकच्या नादात नादुरुस्त ट्रकवर कार धडकली; दोघे ठार, चौघे गंभीर जखमी

जळगावहून अजिंठ्याकडे जाणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाची कार रस्त्यात उभ्या नादुरुस्त ट्रकला पाठीमागून धडकली.
car accident umala ghat

car accident umala ghat

sakal

Updated on

जळगाव - जळगावहून अजिंठ्याकडे जाणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाची कार रस्त्यात उभ्या नादुरुस्त ट्रकला पाठीमागून धडकली. उमाळा गावाकडून गाडेगावच्या दिशेने जाताना घाट उतरल्यावर गुरुवारी (ता. १६) सायंकाळी साडेसहाला हा अपघात घडला. एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोर अचानक आलेल्या ट्रकला वाचविताना कारची धडक बसली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत, तर एका तरुणाला किरकोळ दुखापत झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com