चोपडा येथे 13 व 14 दोन दिवस जनता कर्फ्यू

चोपडा येथे 13 व 14 दोन दिवस जनता कर्फ्यू
Updated on

चोपडा : राज्यासह जळगांव जिल्ह्यात तसेच चोपडा तालुक्यातील कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून, कोरोना साखळी ब्रेक करण्यासाठी जळगांव जिल्हयातील चोपडा, चाळीसगांव व अमळनेर इत्यादी नगरपालिकांच्या हद्दीत निबंध लागू करणे आवश्यक आहे.


जळगाव जिल्हयातील चोपडा व चाळीसगांव या नगरपालिका हद्दीत दिनांक 13 मार्च, 2021 रोजी रात्री 00.01 वाजेपासून दिनांक 14 मार्च, 2021 रोजी रात्री 24.00 वाजेपावेतो जनता कर्फ्यु पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.कोरोना संसर्गजन्य परिस्थिती वर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे याकरीता नगरपालिकांच्या हद्दीत हे निर्बंध लागू केले आहेत.

हे राहणार बंद..

जनता कर्फ्यूमध्ये बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील, किराणा दुकाने, इतर सर्व दुकाने बंद राहतील. किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी-विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था,शाळा,महाविद्यालय, खाजगी कार्यालये बंद राहतील, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील, सभा मेळावे,बैठका ,धार्मिक स्थळे, सांस्कृतिक,धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.शॉपींग मॉल्स मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील.गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील. पानटपरी, हातगाडया, उघडयावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहणार आहेत.

चोपडा मतदारसंघातील जनतेस विनंती आहे की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी चोपडा शहर व तालुक्यातील नागरिक, व्यापारीवर्ग यांनी प्रशासनाच्या वतीने दिनांक 13 ते 14 मार्च रोजी जनता कर्फ्युला सहकार्य करावे.

- लताताई सोनवणे, आमदार

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026
Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Marathi News Esakal
www.esakal.com