एरंडोलकरांनी जनता कर्फ्यु कडकडीत पाळला; सर्व बाजारपेठा बंंद

एरंडोलकरांनी जनता कर्फ्यु कडकडीत पाळला; सर्व बाजारपेठा बंंद
Updated on

एरंडोल ः शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासन,व्यापारी आणि व्यावसायिक यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या पाच दिवसीय जनता कर्फ्युस नागरिक आणि व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.जनता कर्फ्यूमुळे शहरातील सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद होते तर प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.

शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार अर्चना खेतमाळीस,नगराध्यक्ष रमेश परदेशी,उपनगराध्यक्ष अभिजित पाटील,मुख्याधिकारी किरण देशमुख,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह शहरातील व्यापारी,व्यावसायिक आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील पदाधिका-यांची बैठक पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती.बैठकीत प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी कोरोनाचा धोका वाढत असल्यामुळे पाच दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याची सुचना केली असता सर्वांनी त्यास एकमुखाने पाठींबा दिला.बुधवार पासून रविवार पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला.जनता कर्फ्युस सर्व व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त पाठींबा दिला.जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी शहरातील सर्व व्यवहार शंभर टक्के बंद होते.प्रमुख बाजारपेठ आणि रस्त्यांवर शुकशुकाट होता.नागरिकांनी देखील जनता कार्फुस पाठींबा देऊन विनाकारण घराबाहेर फिरण्याचे टाळले.

पोलीसांची गस्त

पोलीस प्रशासन आणि पालिका कर्मचारी दिवसभर शहरात गस्त घालुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत होते.कोरोनाची भीती आणि प्रशासनाच्या कठोर अंबलबजावणीमुळे बुधवारी रस्ते निर्मनुष्य झाले होते. प्रांताधिकारी विनय गोसावी,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व पालिका कर्मचा-यांनी शहरात पायी फिरून नागरिकाना जनता कर्फ्युस सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी व शहर कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी शासकीय आदेशांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार अर्चना खेतमाळीस,नगराध्यक्ष रमेश परदेशी, मुख्याधिकारी किरण देशमुख,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon railway flyover latest update
Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village
Tension in Pimpalner as Maternal Death Leads to Protest Against Doctors
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Marathi News Esakal
www.esakal.com