
जळगाव : वाळू व्यवसायाचा जुना वाद आणि मारेकरी भूषणच्या पत्नीला शिवीगाळ केल्याच्या रागातून भावेशचा खून केल्याची माहिती खून प्रकरणी अटक केलेल्या संशयितांनी दिली आहे. भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी खुर्द) व मनीष नरेंद्र पाटील (वय २२, रा. आव्हाणे) असे दोघांचे नाव असून ते पुण्याहून दुसरीकडे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना बेड्या ठोकत आज (ता. २५) संध्याकाळी जळगावी आणले. (Case of murder of sand businessmen LCB arrest both Jalgaon latest marathi news)
शहरातील निवृत्तीनगरात वास्तव्यास असलेला वाळू व्यावसायिक भावेश उत्तम पाटील (वय २८, मुळ रा.अव्हाणे, ता. जळगाव) याचा मंगळवारी (ता. २३) मध्यरात्री १२:३० वाजेनंतर घरातून बोलावून खून करण्यात आला होता. भावेशचा खून केल्यावर भूषण सपकाळे व मनीष पाटील अशा दोघांनी घटनास्थळावरून पळ काढत थेट भुसावळ गाठले.
तेथून रेल्वेने मुंबई पोचल्यावर सकाळीच पुण्याला रवाना झाले. पुण्यातही त्यांना अटकेची शक्यता वाटत असल्याने तेथून पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर झडप घातली. ताब्यात घेतल्यावर गुरुवारी (ता. २५) संध्याकाळी सात वाजता पथक त्यांना जळगावी घेऊन परतले असून वैद्यकीय तपासणी करत त्यांना अटक करण्यात आली.
गुन्हे शाखेचा सलग पाठलाग
भावेशचा खातमा केल्यानंतर भूषण व मनीष यांनी घटनास्थळावरून शिवाजीनगरमार्गे डांभूर्णी, यावलनंतर भुसावळ गाठले. भुसावळ रेल्वेस्थानकावरून रेल्वेने दोघेही मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती.
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या पथकातील रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, संतोष मायकल, मुरलीधर बारी त्यांच्या मागावर निघाले होते. सलग दोन दिवस संशयितांचा पिच्छा पुरवल्यावर त्यांना पुण्यात बेड्या ठोकण्यात आल्या.
..तर त्यानेच आमचा खून केला असता
‘साहेब, तो पिस्तूल वागवतो वाळूचे पैसे, गाड्या पकडून देण्यावरून त्याच्याशी जुना वाद होता, तसेच त्याने भूषणच्या पत्नीला .शिवीगाळ केल्याचा रागातून भांडण झाल्यानंतर तो पिस्तूल काढतो की, काय म्हणून त्याच्यावर एका मागून एक वार चालवले. त्याला एकही संधी भेटली असती तर त्याने आमचाच गेम केला असता’ अशी कबुली दोघा संशयितांनी पोलिस पथकाला दिली आहे.
सध्या दोनच मारेकरी
अटकेतील संशयितांनी गुन्हा कबूल केला असून ते दोघचं असल्याचे ते सांगतात, पळून जाताना दोघांनी त्याच्या मित्राकडून उधार पैसे घेऊन मुंबईच्या दिशेने गेले होते. न थांबता सलग २ दिवस पथकाने पिच्छा पुरवून त्यांना ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात इतर संशयित असल्यास पोलिस कोठडीत त्याचा उलगडा होईल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.