Jalgaon Crime News : गाडी लावण्यावरून डॉक्टरांना मारहाण ; पोलिसांत गुन्हा दाखल

crime
crimeesakal

Jalgaon Crime News : शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिर जवळील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास आलेल्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर रविवारी (ता.२९) प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात डॉक्टरांचा सहकारी हाताला कोयता लागल्याने जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन हल्लेखोरांसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered for assaulting doctor due to park car jalgaon crime news)

ही महिला पोलीस असल्याची बतावणी करीत होती. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.प्रतापनगर रिंगरोड येथे डॉ. निरज चौधरी (वय ३३) यांचे रुग्णालय आहे. ते पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील नीलकमल रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी रविवारी सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह कारमधून (एम.एच.१९.सी.एफ.५६२८) आले होते.

डॉ. चौधरी यांनी रुग्णालयाबाहेर पार्किंगमध्ये वाहन लावून आत गेले. त्याचवेळेस साधारण पंचवीस वर्षीय तरुण गाडीवर नारळपाणी करत होता. तो धावत आला. त्याने सांगितले की, तुम्ही ज्या जागेवर गाडी लावली आहे, त्या जागेवर नारळाची गाडी लावतो, तुम्ही गाडी काढून घ्या असे म्हणत वाद घालू लागला. तेव्हा डॉक्टरांनी दुसरीकडे वाहन लावायला जागा नाही, ही सार्वजनिक जागा आहे, असे सांगून ते रुग्णालयात निघून गेले.

रुग्णालयातील कर्मचारी निलेश पावरा यांनी डॉ. चौधरी यांना सांगितले, की नारळपाणीवाला तरुण तुमच्या कारची तोडफोड करत आहे, तुम्ही खाली या. डॉक्टर काम सोडून खाली आले, तेव्हा नारळपाणी विक्रेता व त्याच्या सोबतचा एक तरुण असे दोघे डॉ. चौधरी यांच्या अंगावर धावून आले आणि दमदाटी करू लागले. तेव्हा डॉक्टरांचे सहकारी सेनानी व दांगोडे यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्याने अंगावर कोयता उगारत दांगोडे याच्यावर वार केल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली.

crime
Jalgaon Crime News : सराफी दुकानात धाडसी चोरी; 10 हजार लंपास

महिलेची दादागिरी

घटनेच्या ठिकाणी एक महिला शिवीगाळ करत डॉक्टरांकडे आली. ‘तू माझ्या आईला नारळाची गाडी का लावू देत नाही', असे म्हणत तिने डॉ. चौधरी यांना मारहाण केली. ‘मी पोलीस आहे, तुला काय करायचे ते कर', असे म्हणत ती निघून गेली.घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस दाखल झाले.

डॉक्टरांकडून माहिती घेतल्यावर अर्जुन राठोड, सोनू चव्हाण व एक महिला असल्याचे त्यांनी सांगितल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे तपास करत आहेत.

crime
Jalgaon Crime News : घराचे कर्ज फेडण्यासाठी विवाहिता छळाबद्दल गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com