Jalgaon News : ‘गोदावरी’चे उपचार रेल्वे प्रवाशांच्या सेवेत; स्थानकावर तपासणीची सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

During the inspection of the OPD service center at the railway station, Dr. Ulhas Patil, Subhash Patil etc.

Jalgaon News : ‘गोदावरी’चे उपचार रेल्वे प्रवाशांच्या सेवेत; स्थानकावर तपासणीची सुविधा

जळगाव : प्रवासादरम्यान प्रवाशाची प्रकृती बिघडली असता, तत्काळ रुग्णसेवा मिळावी, या उद्देशाने जळगाव रेल्वेस्थानकावर सेंट्रल रेल्वे आणि डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Central Railway and Dr Ulhas Patil Hospital Treatment by at service of railway passengers Inspection facility at station jalgaon news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

बुधवारी (ता. १५) पहाटे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी ओपीडी सेवेस भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील उपस्थित होते. या केंद्रावर तज्ज्ञ डॉक्टर २४ तास उपलब्ध असतील. रक्‍तदाब, इसीजीसह अन्य चाचण्यांची सुविधाही आहे.

२३ जानेवारीपासून जळगाव रेल्वेस्थानकावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाची ओपीडी सेवा सुरू झाली आहे. आतापर्यंत शेकडो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान पडणे, धडपडणे, हृदयविकाराचा त्रास होणे, ग्लानी येणे, अशा रुग्णांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरतेय.