
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी मोठ्या फरकाच्या उन्मेश पाटील यांचा पराभव केला. मंत्री मंगेश चव्हाण हे ८५ हजार ६५३च्या फरकाने विजयी झाले. त्यांना १ लाख ५७ हजार १०१ मतं मिळाली मिळवून विजयी झाले आहे.उन्मेष पाटील यांना ७१ हजार ४४८ मते मिळाली.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष महायुतीचे मंगेश चव्हाण व महाविकास आघाडीच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उन्मेष पाटील यांच्यात सरळ लढत झाली.
उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार व शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा झाली. प्रचारात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला.