Sakal Impact : मागील ‘सीएमव्ही’ची भरपाई येत्या आठवड्यात मिळण्याची चिन्हे; कृषी अधिकारी वाळके यांची माहिती

chances of getting compensation for previous CMV in coming weeks jalgaon news
chances of getting compensation for previous CMV in coming weeks jalgaon news

Sakal Impact : मागील वर्षी २०२२ मध्ये आलेल्या केळीवरील सीएमव्ही रोगाची भरपाई येत्या आठवड्यात तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची चिन्हे आहेत. तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली.

मागील वर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात तालुक्यात जवळपास सर्वच गावातील केळीवर कमी अधिक प्रमाणात सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या विषाणूजन्य रोगाची लागण झाली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात लागवड केलेली केळी उपटून नष्ट करावी लागली होती. या नुकसानीचे पंचनामे होऊन भरपाई मिळण्याबाबत 'सकाळ'ने वारंवार पाठपुरावा केला होता. (chances of getting compensation for previous CMV in coming weeks jalgaon news)

या काळात तालुक्यातील १०५ गावातील ८ हजार ९८ शेतकऱ्यांची ४ हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावरील केळीचे ‘सीएमव्ही’मुळे नुकसान झाले होते. या केळीला प्रती हेक्टरी २२ हजार ५०० रुपये भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यासाठी १० कोटी ४६ लाख ५१ हजार ५५० रुपयांचा निधी आता उपलब्ध झाला आहे.

हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निधी उपलब्ध होऊन महिना झाला तरी पैसे मिळाले नाहीत, अशा तक्रारीवरून ‘सकाळ’ने श्री. वाळके यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले, की मागील वर्षीचे जवळपास ९० टक्के नुकसानीचे पंचनामे आपल्या दप्तरी जमा आहेत.

मात्र त्यातील काही शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक त्यावेळी घेतले गेले नव्हते. तसेच एक-दोन गावांच्या यादीबाबत अजूनही संभ्रम आहे. मात्र लवकरच तो प्रश्न मार्गी लावला जाईल. या सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर भरणे सुरू झाले आहे.

chances of getting compensation for previous CMV in coming weeks jalgaon news
Jalgaon Banana Crop Insurance : केळी पीकविमाप्रश्‍नी कृषिमंत्र्यांचे घूमजाव; जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात

१०५ पैकी ५२ गावांची संपूर्ण माहिती पोर्टलवर भरली असून उर्वरित ५३ गावांची माहिती भरण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असून, त्यानंतर तातडीने सर्वच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षीचे पंचनामे लवकरच

यावर्षी २०२३ मध्ये देखील तालुक्यातील केळीवर सीएमव्ही रोगाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील सुमारे ९५ गावातील ४९०० हेक्टर्स केळीवर प्रादुर्भाव आढळून आला आहे. या नुकसानीचे पंचनामे होण्यासाठी ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता.

आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांचे पथक पंचनामे करणार असून, आगामी पंधरवड्यात हे पंचनामे पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तालुक्याच्या कृषी कार्यालयात ३६ कृषी सहाय्यकांची पदे असताना फक्त ११ कृषी सहाय्यक उपलब्ध आहेत. त्यामुळे या पंचनाम्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. यामुळे वेळ लागण्याची शक्यता श्री. वाळके यांनी व्यक्त केली आहे.

chances of getting compensation for previous CMV in coming weeks jalgaon news
Beneficial Raw Banana: चांगल्या आरोग्यासाठी पिकलेली केळीच कशाला हवी, कच्चे केळ खाण्याचेही आहेत अनेक फायदे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com