
घरात घुसून मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
वरणगाव (जि. जळगाव) : येथून जवळच असलेल्या फुलगाव येथे घरात घुसून शिवीगाळ, तोडफोडीसह मारहाण (beating) करणाऱ्या तीन युवकांवर पोलिसांत (ता. २२) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Charges filed against 3 in assault case Jalgaon Crime News)
फुलगाव येथील विलास उर्फ अतुल पाटील यांच्या घरी बुधवारी (ता.२२) दुपारी तीनच्या सुमारास फुलगावमधील रहिवासी सिद्धांत राजेंद्र चौधरी व त्याच्या दोन साथीदारांनी घरी येऊन विलास यास शिवीगाळ केली केली. या वेळी घराच्या गेटजवळ विटांचा व लोखंडी पट्ट्यांचा मारा करून घरातील महिलांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात काठ्या होत्या व झटापटीत या महिलेचे २५ ग्रॅम सोन्याची पोत गायब झाली आहे.
हेही वाचा: Jalgaon : आमदार ‘नाथां’सोबत अन् कार्यकर्ते अनाथ
तर या वेळी घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीचे देखील नुकसान केले आहे. नंतर संशयिताचा काका प्रमोद चौधरी यांनी त्याला निघून जाण्यास सांगितले. दोन दिवसांपूर्वी सुद्धा याच व्यक्तीने विलास यांच्या वडिलांच्या व मुलीच्या अंगावर दुचाकी आणण्याचा प्रयत्न करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पल्लवी विलास पाटील (वय ३३) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित संशयित सिद्धांत यास पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले असून, पोलिस दोन साथीदारांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा: जळगाव : बोदवडला ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चे तीनतेरा
Web Title: Charges Filed Against 3 In Assault Case Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..