Jalgaon News : मेंदूज्वराने ग्रस्त बालकाला मृत्यूच्या दाढेतून काढले; डॉ पाटील रुग्णालयातील टीमचे यश

Japanese Encephalities
Japanese Encephalitiesesakal

Jalgaon News : मेंदूज्वराने ग्रस्त सहावर्षीय बालकावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगतज्ज्ञांसह टीमने वेळीच उपचार करून या बालकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. (child suffering from Encephalitis was saved by doctor from Dr Patil Hospital jalgaon news)

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. उमाकांत अणेकर यांनी याबाबत सांगितले, की अशा प्रकारची ही पहिलीच केस पाहण्यात आली. बालकाला आणले तेव्हा तो बेशुद्ध होता. त्याला झटके येत होते, तापही होता. तसेच इंट्राक्रेनियल हायपरटेंशन अर्थात मेंदूवराची सूज होती. त्यातून बालकाचे सर्व अवयव निकामी होण्याच्या मार्गावर होते.

Japanese Encephalities
Gulabrao Patil : स्वच्छतेत 50 टक्के गावे मॉडेल घोषित करा : गुलाबराव पाटील

बालरोग विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. अणेकर, निओनेटोलॉजिस्ट डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. गौरव पाटेकर, निवासी डॉ. सुरुची शुक्ला, डॉ. चंदाराणी या टीमने जिद्दीने प्रयत्न करून बालकावर प्रभावी उपचार केल्यानंतर बालक उठून बसायला लागला, जेवण करू लागला.

एमआरआय केला असता, बालकाच्या मेंदूवर सूज असल्याचे निर्दशनास आले, त्यावरही औषधोपचार केले. इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळेच मुलगा वाचू शकला, अशी प्रतिक्रिया रुग्ण बालकाच्या आईने व्यक्त केली.

Japanese Encephalities
Jalgaon News : जळगावमध्ये या तारखांदरम्यान धान्य महोत्सव; शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com