जळगाव : अठरा वर्षांखालील मुले दुचाकीवर सुसाट

विनापरवाना सर्रास ड्रायव्हिंग; वयोमर्यादा घटविण्याची अपेक्षा
Children are seen riding two wheeler
Children are seen riding two wheelersakal

जळगाव : शिकवणी, शाळा, महाविद्यालय, प्रात्यक्षिके आदी दिवसभराचा व्यस्त कार्यक्रम प्रत्येक ठिकाण घरापासून दूर वेळही पाळायची, अशा वेळी वाहनाशिवाय पर्याय नाही. पण, वयात न आल्याने परवाना नाही मग, विनापरवाना दुचाकीवर स्वार व्हायचे नववीच्या ‘व्हॅकेशन’पासूनच विद्यार्थ्यांचा हा दिनक्रम सुरू होतो. दहावीनंतर वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या शिकवण्या, शिवाय विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना तर प्रात्यक्षिकेही सांभाळावी लागतात. सकाळी सहा ते सातलाच त्यांची ही धावपळ सुरू होते. वेळेचे नियोजन व श्रम नको म्हणून त्यासाठी वाहन वापरण्याशिवाय पर्याय उरत नाही. पालकही पाल्यांच्या सोयीसाठी वाहन वापरायला अनिच्छेने का होईना परवानगी देतात. मात्र, विनापरवाना वाहन चालविण्यासंबंधी नियम कठोर झाले असून, थेट पालकांवर गुन्हा दाखल होत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तरीही मुले दुचाकीवर सुसाट फिरताना दिसतात.(Children are seen riding two wheeler)

Children are seen riding two wheeler
जळगाव : मुलीच्या माहेरच्यांकडून व्याह्याला बेदम मारहाण

तांत्रिकदृष्ट्या अडचण

तांत्रिकदृष्ट्या १८ वर्षांखालील मुलांना वाहन परवाना दिला जात नाही. ५० सीसीपर्यंतच्या वाहनांसाठी १८ वर्षांखालील मुलांना लर्निंग लायसन्स दिले जाते. ते दर सहा महिन्यांनी नूतनीकरण करावे लागते; परंतु सध्याच्या काळात ५० सीसीपर्यंतचे वाहन बनवलेच जात नाही. त्यामुळे मुलांची मोठी अडचण होते.(jalgaon news)

Children are seen riding two wheeler
जळगावः तरुणांना हटकल्याचा आला राग..चक्क पोलिसाला बेदम मारहाण

जळगाव : मुलीच्या माहेरच्यांकडून व्याह्याला बेदम मारहाण७० टक्के विद्यार्थी वाहनांवर

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी जवळपास ७० टक्के विद्यार्थी खासगी शिकवण्या लावतात, त्यासाठी त्यांना क्लास, कॉलेज आदींची नियोजन पाळण्यासाठी वाहनाचा वापर करण्याशिवाय पर्याय नसतो. काही मुले-मुली सायकलीवरही धावपळ करतात. मात्र, त्यात वेळ व श्रम वाया जात असल्याने मुलांची अडचण होते.

बारावीनंतरही वर्षभर प्रतीक्षा

विशेष म्हणजे सध्याच्या वाहन परवाना देण्याच्या नियमानुसार १८ वर्षांवरील मुलांनाच तो दिला जातो. प्रत्यक्षात बारावीपर्यंतही मुले १८ वर्षांची होत नाहीत. बारावीनंतर किमान वर्षभराने त्यांचे वय १८ होते. तेव्हा त्यांना परवाना मिळू शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम योग्यच असला तरी बदलत्या काळात तो कालबाह्य ठरत आहे. बारावीपर्यंत गेलेले बहुतांश विद्यार्थी कारही चालवून घेतात आणि अन्य कुठल्याही व्यावसायिक चालकाप्रमाणेच.

Children are seen riding two wheeler
जळगाव : मुलीच्या माहेरच्यांकडून व्याह्याला बेदम मारहाण

नियम बदलाची गरज

या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने आपल्या नियमांमध्ये काहीअंशी बदल करायला हवेत. त्यासाठी किमान १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी विनागिअरच्या वाहनाचा परवाना देण्यास हरकत नाही. आगामी काळात तसे झाले नाही तर हजारो, लाखो विद्यार्थी विनापरवाना दुचाकी दामटताना दिसतील.

खरेतर वाहन परवान्यासाठी निश्‍चित केलेली किमान १८ वर्षे वयाची मर्यादा सध्याच्या काळात योग्य नाही. दहावीनंतरच मुलांना वाहनाची आत्यंतिक गरज भासते. अशा वेळी विनागिअरच्या वाहनासाठी परवाना देण्याची १८ वर्षे वयाची अट शिथिल करून ती १६ वर्षे करता येण्यासारखे आहे.

-जमील देशपांडे, संचालक, देशपांडे मोटार ड्रायव्हिंग स्कूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com