Jalgoan Protest News :जळगावात रस्त्यावरच्या खड्ड्यांचे केले पूजन; नागरिकांचे स्वयंस्फूर्त आंदोलन

citizen performing symbolic puja on  road in front of the collector office.
citizen performing symbolic puja on road in front of the collector office.esakal

Jalgoan Protest News : शहरातील रस्ता दुरुस्ती वरून महापालिकेतील सत्ताधारी आणि भाजप आमदार यांच्या वादात कामे रखडल्याने आता दुरुस्तीसाठी जनताही रस्त्यावर उतरली आहे.

त्यातच रस्त्यातील खड्ड्यांचे फुलहार घालून हळद- कुंकू लावून प्रतीकात्मक पूजन करण्यात आले. तसेच तातडीने रस्ता दुरूस्तीची मागणी करण्यात आली आहे. (citizen perform symbolic puja on road in front of the collector office jalgaon protest news)

जळगाव शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याची मोठी समस्या आहे. राज्य शासनाने यासाठी १०० कोटी, ४२ कोटींचा असा दोन टप्प्यात निधी दिला आहे. आमदारांनी हा निधी आणल्याचा दावा करीत ही कामे महापालिकेद्वारे न करता राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहेत.

या विभागामार्फत शहरात कामे करताना महापालिकेला कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप महापालिका करीत आहे, तर महापालिका कामासाठी ना हरकत देत नसल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

citizen performing symbolic puja on  road in front of the collector office.
Jalgaon News : रस्त्यांच्या कामात सत्ताधारी गटाकडून अडवणूक; विधिमंडळात भोळेंचा प्रश्न

या वादात शहरातील रस्त्याची कामे रखडली आहेत. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे आता रस्त्याच्या खड्डे दुरुस्तीसाठी जनताही रस्त्यावर उतरली आहे.

जळगावातील नागरिक भरत कार्डिले यांच्या नेतृत्वाखलील युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याला पुष्पहार अर्पण करून हळद कुंकू वाहून अनोखे आंदोलन करीत रस्ता दुरुस्तीची मागणी केली. जर ताबडतोब काम झाले नाही तर हजारो नागरिकांना घेऊन आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे .

citizen performing symbolic puja on  road in front of the collector office.
Jalgaon Corporator Protest : डॉ. अश्‍विन सोनवणेंच्या साखळी उपोषणला सर्व पक्षीय नगरसेवकांचा प्रतिसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com