Jalgaon News : भुसावळकरांना विकास हवा, मग कर भरावाच लागेल : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जिल्हाधिकारी म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था चालवायची असेल तर पाणी कर, घरपट्टी कर भरणे अनिवार्य आहे, हे भरल्यास पालिकेच्या माध्यमातून विकास कामे होतात.
Collector Ayush Prasad
Collector Ayush Prasadesakal

Jalgaon News : नागरिकांना दैनंदिन सुविधा पथदीप, पिण्याचे पाणी अशा सुविधा हव्या असतील तर त्यावरील खर्च भरलेल्या करामधून केला जात असल्याने नागरिकांना पालिकेचा कर भरावाच लागेल, तरच पालिकेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देता येतील, असे प्रतिपादन जिल्ह्याधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हाधिकारी म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था चालवायची असेल तर पाणी कर, घरपट्टी कर भरणे अनिवार्य आहे, हे भरल्यास पालिकेच्या माध्यमातून विकास कामे होतात. (Collector Ayush Prasad statement Bhusawal people want development then they have to pay taxes jalgaon news)

भुसावळ पालिकेची थकबाकी मोठ्या प्रमाणात असून, आतापर्यंत ११ टक्के वसुली आहे. नागरिकांना सुविधा पथदीप, पिण्याचे पाणी, स्वच्छता यासारख्या सुविधासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारा खर्च पेलू शकत नाही, जर नागरिकांनी पालिकेची १०० टक्के कराची थकबाकी भरल्यास नागरिकांना उत्तम प्रकारे सुविधा पालिका देऊ शकते.

खुल्या भूखंडांचा वापर करा

महापालिकेच्या अतिक्रमणापुर्वी पुनर्वसन अनिवार्य आहे, मगच अतिक्रमण काढले जाईल. कुठलाही परिवार रस्त्यावर येणार नाही. रस्त्यावर छोटे - छोटे व्यवसाय करणारे अतिक्रमण करीत आहे.

पालिकेने एखाद्या खुल्या भूखंडावर दुकाने उभारून ती दुकाने अतिक्रमणधारकांना दिल्यास रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्नही सुटेल व पालिकेच्या उत्पन्नात वाढही होईल. जर एखाद्या मोकळ्या जागेवर उद्यान मंजूर झाले आहे.

ते तयार होण्यासाठी विलंब होत असेल तर त्या जागेचा उपयोग अतिक्रमण धारकांसाठी दुकाने बनविण्यासाठी करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. भाजी बाजारासाठी जागा उपलब्ध नसेल तर पालिकेच्या माध्यमातून ओटे बांधकाम करून मिळेल, यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटेल.

Collector Ayush Prasad
Jalgaon Municipality News : महापालिकेचे 981 कोटी 47 लाखाचे अंदाजपत्रक सादर

‘अमृत’चा पाठपुरावा

खडका- किन्ही औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत योजनेच्या कामांचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर पाणी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पाणी जपून वापरा

पावसाळा कमी प्रमाणात झाल्याने आगामी काळात पाणीटंचाई प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलर प्लांट योजनाही सुरू करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी जलवाहिनीची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे.

निवडणुकीसाठी सॉफ्टवेअर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीचे एकाच ठिकाणी नाव हवे, यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. बीएलओंच्या माध्यमातून घरोघरी जाउन माहिती संकलन सुरु असल्याचे सांगितले.

Collector Ayush Prasad
Jalgaon News : जळगावात राष्ट्रवादी अजित पवार,शरद पवार गट आमने सामने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com