Jalgaon News : महसूल विभागाची वसुली शंभर टक्के करा; जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Revenue-Department Work News

Jalgaon News : महसूल विभागाची वसुली शंभर टक्के करा; जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६० टक्के महसूल (Revenue) वसुली झाली आहे. (Collectors suggestion in officials meeting to collect 100 percent of revenue department jalgaon news)

केवळ एका महिन्यात महसूल वसुलीचे टार्गेट पूर्ण करा, पंतप्रधान ग्रामीण योजनेची प्रलंबित प्रकरणे त्वरित पूर्ण करा, गौणखजिन व जमीन महसूलबाबत दिलेले लक्षांक अधिकाऱ्यांनी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी (ता. १) येथे दिल्या.

महसूल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जामनेर तालुक्याला चार कोटींचे टार्गेट दिले होते. त्यांनी चार कोटी तीन लाख वसूल करून १००.६१ टक्के वसुली केल्याबाबत कौतुक करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार या वेळी उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांबाबत दिलेले लक्षांक पूर्ण करण्यावर भर द्यावा. ७० कोटी वसुलीचे टार्गेट होते त्यापैकी २७ टक्के झाले आहे. ४० टक्के वसुली अद्यापही बाकी आहे. ती वसुलीसाठी सर्वांनी कामाला लागा.

आगामी काळात कडक उन्हळ्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना पोचणार नाहीत याची काळजी घेत त्यावर तातडीच्या उपाययोजना करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

लवकरच वाळूउपशाबाबत नवीन धोरण जाहीर होईल. त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. गौण खजिन वसुलीचे टार्गेट ७२ कोटी ८२ लाख एवढे होते. त्यापैकी ५२ कोटी ३३ लाख म्हणजेच ७१ टक्के वसूल झाले आहे.

जमीन महसूल लक्षांक व पूर्ण झालेले लक्ष असे ः

तालुका -- लक्षांक -- वसूल -- टक्केवारी

बोदवड -- एक कोटी ५० लाख -- ३२ लाख ४७ हजार -- २१.६५ टक्के

जळगाव -- १९ कोटी ९० लाख -- पाच कोटी ५५ लाख -- २७.९२

भडगाव -- दोन कोटी -- ५३ लाख ८४ हजार -- २६.९२

चोपडा -- चार कोटी ५० लाख -- एक कोटी ५७ लाख -- ३४.९८

अमळनेर -- तीन कोटी ५० लाख -- एक कोटी २८ लाख -- ३६.६३

पारोळा -- दोन कोटी २५ लाख -- ८२ लाख ८६ हजार -- ३६.८३

धरणगाव -- दोन कोटी २५ लाख -- ९७ लाख २० हजार -- ४३.२०

चाळीसगाव -- सात कोटी -- एक कोटी ६० लाख -- २२.९६

पाचोरा -- चार कोटी -- एक कोटी ९५ लाख -- ४८.९८

मुक्ताईनगर -- दोन कोटी ६० लाख -- एक कोटी ५४ लाख -- ५९.२६

यावल -- चार कोटी ५० लाख -- एक कोटी ८२ लाख -- ४०.५२

भुसावळ -- पाच कोटी ७५ लाख -- एक कोटी ६९ लाख -- २९.५४

रावेर -- चार कोटी ५० लाख -- दोन कोटी २४ लाख -- ४९.८७

जामनेर -- चार कोटी -- चार कोटी तीन लाख -- १००.६१

एरंडोल -- दोन कोटी -- एक कोटी २० लाख -- ६०.४८

एकूण -- ७० कोटी २५ लाख -- २७ कोटी १८ लाख -- ३८.६९ टक्के