खड्ड्या’त गेले चाळीसगाव! जलवाहिन्यांच्या कामामुळे चाळण; पालिकेसह ठेकेदाराची डोळेझाक

The condition of roads
The condition of roads
Updated on

चाळीसगाव (जळगाव) : शहरात सध्या ७० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे; परंतु या कामामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. जलवाहिनी खोदण्यात आलेल्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य असून, तेथे नागरिकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासन व ठेकेदार डोळेझाक करीत असून, चाळीसगावकरांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

शहराला व्यवस्थित व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी तब्बल ७० कोटी रुपये खर्चून १९० किलोमीटरची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. जलवाहिनीचे काम सुरवातीपासूनच वादग्रस्त असून, पालिकेच्या सभेतही याबाबत अनेकदा वादळी चर्चा झाली आहे. १९० किलोमीटरपैकी जवळपास ८० टक्के जलवाहिनी टाकण्याचे काम शहरात पूर्णत्वास आले आहे; परंतु अनेक ठिकाणी संबंधित ठेकेदाराने रस्ते खोदून जलवाहिन्या टाकल्या. तेथे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. 

शहरातील बहुतांश ठिकाणी कच्चे रस्ते असल्याने जलवाहिन्यांमुळे पावसाचे पाणी पडून चिखल झाला आहे. मागील आठवड्यात सतत दोन दिवस पाऊस पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून, यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तर छोटे-मोठे अपघातही झाले असून, नागरिक जखमीही झाले आहेत. 

मुरूम टाकण्याची जबाबदारी कोणाची? 

शहरात वाढीव पाणीपुरवठा योजना करून एकीकडे विकास केला जात आहे, तर दुसरीकडे मात्र विकास होत असताना जलवाहिनीमुळे चिखल साचून नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर्षी पालिकेकडून मुरूम टाकण्याची निविदा तब्बल दोन महिने उशिरा झाली आहे. जलवाहिन्यांची कामे केल्याने आता चिखलावर मुरूम टाकण्याची जबाबदारीही संबंधित ठेकेदार व पालिका प्रशासनाची असताना अनेक ठिकाणी तो टाकला गेलेला नाही. यामुळे ही जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Marathi News Esakal
www.esakal.com