Jalgaon Crime News : वाघोळा प्रकल्पाजवळ गोंधळ; चोरीच्या संशयावरून 5 जणांना अटक

A crowd of farmers gathered on Jamner-Buldana road near Waghola project late on Friday night.
A crowd of farmers gathered on Jamner-Buldana road near Waghola project late on Friday night.esakal

शहापूर (जि. जळगाव) : येथील वाघोळा प्रकल्पावरून गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या वायरी व वीजपंप चोरी होण्याचे प्रमाण वाढले असून, शनिवारी (ता. २५) रात्री आठच्या सुमारास प्रकल्पस्थळी संशयितरीत्या फिरणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आला.

दरम्यान, चोरीचे साहित्य चोरट्यांकडून कोणी खरेदी करतो, गुन्ह्याची पाळेमुळे शोधून काढण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत तीन तास ठिय्या मांडला होता. (Confusion near Waghola Project 5 people arrested on suspicion of theft Jalgaon Crime News)

येथील शेतकरी सुभाष धना पाटील व त्यांचा मुलगा सचिन शनिवारी (ता. २५) शेतातून घरी येत असताना त्यांना तीन पुरुष व दोन अनोळखी महिला दिसल्या.

त्यांची विचारपूस केली असता ते योग्य माहिती देत नसल्याने त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना कळवली व त्या परिसरातील शेतकरी तेथे पोहोचले शेतकऱ्यांनी संशयिताना थांबवून पोलिस ठाण्यात याविषयी माहिती देण्यात आल्याने जामनेर पोलिस घटनास्थळी पोहोचले.

तेव्हा शेतकऱ्यांनी संबंधित संशयितांनी चोरलेले साहित्य कोण घेतो, याच्या नावाचा उलगडा झाल्याशिवाय येथून पोलिस गाडी जाणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने नऊपासून दहापर्यंत प्रकल्पस्थळी जामनेर - बुलडाणा रस्त्यावर सर्व शेतकरी ठाण मांडून बसले.

शेतकरी ऐकत नसल्याने पोलिसांनी पुन्हा जामनेर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांची अधिक कुमक मागवली. पोलिस ठाण्यात जाऊन रितसर गुन्हा दाखल करण्यात आल्यावर सविस्तर चौकशी करण्यात येईल, असे पोलिस सांगत होते. मात्र रात्रीचा अंधार, शेतकऱ्यांचा प्रचंड रोष व तरुणांची हुल्लडबाजी यामुळे पोलिसही हतबल झाले होते. हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

A crowd of farmers gathered on Jamner-Buldana road near Waghola project late on Friday night.
Jalgaon Crime News : 16 वर्षीय मुलीला अनैतिक कृत्य करण्यास पाडले भाग; 3 भामट्यांना अटक

पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

घटनास्थळावर काही शेतकरी व लोकप्रतिनिधींनी याविषयी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण तरी शेतकरी ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पोलिसांच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला व रात्री अकराला सर्व संशयितांना घेऊन पोलिस ठाण्यात आल्यानंतर सुभाष पाटील यांच्या तक्रारीवरून संशयित जितेंद्र भिल्ल, सोमनाथ भिल, प्रताप भिल, मंगलाबाई भिल या एकाच कुटुंबातील चार जणांसह हिराबाई भिल (एकलव्यनगर जामनेर) यांच्याविरोधात जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

A crowd of farmers gathered on Jamner-Buldana road near Waghola project late on Friday night.
Satara Crime News : तोतया पोलिस बनून वृद्धांना लुटण्याचा फंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com