
ग्रामीण भागात तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष पोचलेला असल्याने त्याचा फायदा या निवडणुकीत निश्चित होणार आहे. पक्ष जोमाने ग्रामापंचायत निवडणुका लढविणार.
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका काँग्रेस जोमाने लढविणार असून, जास्तीत जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, असे मत जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी पक्षाच्या जिल्हा बैठकीत व्यक्त केले.
आवर्जून वाचा- स्वस्तात वस्तूचा फंडा, अन् ५१ लाखांचा गंडा -
काँग्रेस भवनात पक्षाची जिल्हा बैठक झाली. जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील अध्यक्षस्थानी होते. सध्या राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यभर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने काँग्रेसनेही त्याबाबतीत जिल्हास्तरावर बैठक घेऊन कंबर कसली आहे. यासाठी काँग्रेसचे जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकत्रितरीत्या ताकदीनिशी सामोरे जाण्याचा एकमुखी निर्धार या वेळी करण्यात आला. निवडणुकीत जास्तीत जास्त जागा काँग्रेसच्या येतील यासाठी रणनीती आखण्यात आली.
जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील या वेळी म्हणाले, की ग्रामीण भागात तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष पोचलेला असल्याने त्याचा फायदा या निवडणुकीत निश्चित होणार आहे. पक्ष जोमाने ग्रामापंचायत निवडणुका लढविणार असून, जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
आवश्य वाचा- गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची शिकार; लढविली होती शक्कल
जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदिया, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, माजी आमदार निळकंठ फालक, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, सुरेशबापू पाटील, माजी शहराध्यक्ष डॉ. ए. जी. भंगाळे, सुलोचना पाटील, श्री. खलाने, जमील शेख, अविनाश भालेराव, योगेंद्र पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. हितेश पाटील, एनएसयूआय जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे, मुनावर खान, प्रतिभा मोरे, विकास वाघ, ॲड. अमजद पठाण, सचिन सोमवंशी, शंकर पहेलवान, प्रवीण पाटील उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे