Awas Yojana : आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 awas Gharkula yojana

Awas Yojana : आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी

जळगाव : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरांसाठी बांधकाम परवानगी देण्यात आली.

खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सोमवारी (ता. २७) जळगाव महापालिका सभागृहात प्रधानमंत्री आवास योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) झालेल्या शिबिरास लाभार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. या वेळी अनेक लाभार्थ्यांना नकाशे मंजुरी व बांधकाम परवानगी देण्यात आली.

या वेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगररचनाकार अशोक करवंदे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, तांत्रिक सल्लागार मनीष भुतडा, त्यांचे सहकारी, कर्मचारी, नगररचना विभागातील सर्व रचना सहाय्यक व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

सोमवारी होणाऱ्या शिबिराचा शेवटचा दिवस असून, एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले असून, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonaawas yojna