Latest Jalgaon News | वॉटरग्रेस म्हणते दिवाळी आली कचरा वाढला; नगरसेवक म्हणतात वॉटरग्रेसला हाकलाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon : वॉटरग्रेस म्हणते दिवाळी आली कचरा वाढला; नगरसेवक म्हणतात वॉटरग्रेसला हाकलाच!

जळगाव : महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहामध्ये आमदार राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती आढावा बैठक झाली. या बैठकीवेळी महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, महापौर जयश्री महाजन, उपायुक्त अभिजित बाविस्कर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत पाटील, शहर अभियंता एम. जी. गिरगावकर आदी अधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांनी शहरातील साफसफाईबाबत तक्रारी केल्या. (Controversy over watergrace work in Ward Committee Review Meeting at jalgaon municipal corporation jalgaon news)

हेही वाचा: Crime News : घटस्फोटित तरुणीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

त्यांनी सांगितले, की शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका प्रशासन संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई करत नाहीये. या ठेकेदाराला पाठीशी घालत आहे, असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी मनपात झालेल्या प्रभाग समिती आढावा बैठकीत केला. या वेळी सर्व नगरसेवकांनी वॉटरग्रेस कंपनीचा ठेका ताबडतोब रद्द करावा, त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी केली. या वेळी जळगाव शहरात अस्वच्छता पसरली आहे. मात्र ठेकेदार कोणालाही जुमानत नाही. ठेकेदाराला महापालिका प्रशासन पाठीशी घालत आहे, असा आरोप सर्वांनी केला.

नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी वॉटरग्रेस कंपनीच्या ३५ घंटागाड्या बंद आहेत तरीदेखील कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप केला, तर नगरसेवक प्रा. सचिन पाटील यांनीदेखील प्रशासन या कंपनीच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट न करता त्याला पाठीशी घालत आहेत कशी, अशी तक्रार केली. माजी उपमहापौर आश्विन सोनवणे यांनी ठेकेदार कोणतेही काम करत नसून त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने मक्तेदार कोणाचेच ऐकत नाही, असा आरोप केला.

हेही वाचा: Agriculture News : शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या ; शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे निवेदन

दिवाळी आली, शहरातला कचरा वाढला

नगरसेवक कैलास सोनवणे, प्रशांत नाईक आदींनी शहरात कचरा उचलला जात नसल्याची तक्रार केली. आमदार सुरेश भोळे यांनी याबाबत ‘वॉटरग्रेसच्या प्रतिनिधीला विचारणा केली त्या वेळी दिवाळी आली त्यामुळे सर्व जण साफसफाई करीत आहेत, त्यामुळे कचरा वाढला आहे, असे अजब उत्तर दिले. या उत्तराने सर्वच पदाधिकारी व अधिकारी अवाक झाले.

अमृत़’चा प्रतिनिधीच नाही

अमृत योजनेबाबत नगरसेवकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. अनेक ठिकाणी अमृत योजनेचे खोदकाम झाले; परंतु चाऱ्याच बुजविण्यात आल्या नसल्याबाबत तक्रारी करण्यात आल्या, तर काही ठिकाणी नळ कनेक्शन दिले नसल्याच्या तक्रारी होत्या, मात्र त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अमृत योजनेचे मक्तेदाराचे कोणतेही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्याबाबत सर्वांनीच नाराजी व्यक्त केली.