esakal | दहा दिवसात सासू,सासरे आणि सुनेचा कोरोनाने घेतला बळी
sakal

बोलून बातमी शोधा

दहा दिवसात सासू,सासरे आणि सुनेचा कोरोनाने घेतला बळी

कोरोनाची लागण झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची तब्येत जास्तच खराब झाल्यामुळे त्याना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

दहा दिवसात सासू,सासरे आणि सुनेचा कोरोनाने घेतला बळी

sakal_logo
By
अल्हाद जोशी

एरंडोल : येथील गांधीपुरा भागातील रहिवासी असलेल्या लोहार कुटुंबातील सासू,सासरे आणि सुन यांचा केवळ दहा दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबातील प्रमुख सदस्यांचे निधन झाल्यामुळे सोळा वर्ष वयाचा मुलगा, तेरा वर्ष वयाचा गतीमंद मुलगा अनाथ झाले आहेत. तर परिवारातील एक दिव्यांग व्यक्ती देखील आईवडिलांच्या मायेला मुकला आहे.

आवश्य वाचा- नियमांच्या शर्यतीत अडचणींचा ‘स्पीडब्रेकर’ 
 

शहरातील गांधीपुरा भागातील रहिवासी असलेले पितांबर नारायण लोहार यांच्या परिवारावर कोरोना काळ बनून आला आणि सासू,सासरे आणि सुनेचा कोरोना महामारीत बळी गेला.लोहार परिवारात कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचार सुरु असतांनाच तिघांना मृत्यूने गाठले.पितांबर लोहार यांच्या पत्नी इंदुबाई पितांबर लोहार (वय-70) यांचे 29 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालयात निधन झाले. इंदुबाई लोहार यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे पती पितांबर लोहार आणि सुन संगीता लोहार यांच्यावर दुखा:चा डोंगर कोसळला.या दुखा:तून सावरत नाही तोच पितांबर नारायण लोहार यांचे 4 एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झाले.

सुनेचाही मृत्यू

सासू,सासरे यांचे निधन झाल्यामुळे पूर्णपणे खचलेल्या त्यांच्या सुन संगीता सुनील लोहार यांना देखील कोरोनाची लागण झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची तब्येत जास्तच खराब झाल्यामुळे त्याना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संगीता लोहार यांचेवर उपचार सुरु असतांना त्यांची बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निधन झाले.

वाचा- कोरोना संसर्गामुळे अव्हाणी वाळू ठेका झाला बंद ! 
..

सर्वत्र हळहळ..

एकाच परिवारातील तीन सदस्यांचा केवळ दहा दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.पितांबर लोहार हे शेतीसह कृषी अवजारे बनवून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत होते.संगीता लोहार यांचे पती सुनील लोहार यांचा सुमारे दहा वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यू झाल्यानंतर संगीता लोहार यांनी दोन मुले आणि एका मुलीला कष्ट करून वाढवले होते.संगीता लोहार यांच्या पच्छात विवाहित मुलगी,सोळा व तेरा वर्ष वयाचे दोन मुले आहेत.त्यांचा तेरा वर्ष वयाचा मुलगा मतीमंद आहे.तसेच पितांबर लोहार यांचा देखील एक मुलगा दिव्यांग आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image