
गेल्या २४ तासांत बरे झालेल्या ५५ रुग्णांसह एकूण बरे झालेले रुग्ण ५४ हजार १३३ असून आतापर्यंत १३२९ रुग्णांचा बळी गेला आहे.
जळगाव: नववर्षाच्या प्रारंभीच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या दोन दिवशी पन्नाशी पार केलेल्या रुग्णसंख्येने शुक्रवारीही ६६चा आकडा गाठला. तर दिवसभरात ५५ रुग्ण बरे झाले.
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरनंतर कोरोना संसर्ग नियंत्रित होत असताना डिसेंबरच्या अखेरीस मात्र पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरवात केल्याचे दिसत आहे. ३० डिसेंबरला ८०, ३१ला ६० व १ जानेवारीला पुन्हा ६६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ९२१वर पोचली आहे.
आज एकाचा मृत्यू नाही
गेल्या २४ तासांत बरे झालेल्या ५५ रुग्णांसह एकूण बरे झालेले रुग्ण ५४ हजार १३३ असून आतापर्यंत १३२९ रुग्णांचा बळी गेला आहे. सुदैवाने शुक्रवारी एकाही मृत्यूची नोंद नाही.
नागरिकांचा निष्काळजी पणा सुरूच
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहे. नागरिकांना वारंवार सांगूण सुरक्षीत उपायोजना तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याच्या सुचना दिल्या जात आहे. परंतू नागरीकांकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे.
लग्नांमूळे कोरोनाचा धोका वाढला
शासनाने लग्नसमारंभाला पन्नास लोकांची परवानगी दिली आहे. मात्र तरी देखील लग्नात मोठी गर्दी असून कोरोना बाबात कोणतीही सुरक्षित उपायोजना घेतली जात नसल्याचे चित्र आहे.